bigg boss 16 winner mc stan debut bollywood with shah rukh khan jawaan movie sakal
मनोरंजन

MC Stan: जिंकलंस मर्दा! एमसी स्टॅनचं बॉलीवुडमध्ये पदार्पण! शाहरुखच्या चित्रपटात करणार..

'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यापासून रॅपर एमसी स्टॅनचं नशिबच उजळलं आहे..

नीलेश अडसूळ

रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यापासून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत, त्याने भल्या भल्या बॉलीवुड सेलेब्रिटींनाही मागे टाकले आहे. सध्या एमसी रस्त्यावर उतरला तरी हजारोंची गर्दी त्याला पाहायला मिळत आहे. अशातच त्याच्या लाखों चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

आपल्या हटके बाजाने आणि भन्नाट गाण्याने प्रसिद्ध असलेला स्टॅन बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो एका चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे.

मध्यंतरी स्टॅनचे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिदबरोबरचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे साजिद-वाजिदने स्टॅनला चित्रपटात गाणं ऑफर केल्याची चर्चा आहेच. अशातच आता तो चित्रपटात काम करणार असल्याचेही बोलले जात आहे. किंग खान म्हणजे शाहरुखच्या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

एमसी स्टॅनच्या एका फॅन पेजवरुन एक ट्विट करण्यात आले आहे, ज्यामध्ये एमसी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 'जवान' चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्टॅनशी संपर्क साधल्याचे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

परंतु, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून किंवा एमसी कडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या वार्तेने त्याचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर एमसी स्टॅन भलताच चर्चेत आला आहे. स्टॅनला अनेक ब्रॅण्डकडून जाहिरातींच्या ऑफरही आल्या आहेत. शिवाय देशभरात त्याच्या गाण्यांचे कार्यक्रम होणार आहे. या त्याच्या भारत दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT