bigg boss 17 fame Sana Raees Khan in trouble, stylist makes serious allegations SAKAL
मनोरंजन

Sana Raees Khan: बिग बॉसमधून बाहेर गेलेली सना खान अडचणीत, स्टायलिस्टने केले गंभीर आरोप

सना खानवर तिच्या स्टायलिस्टने गंभीर आरोप केले आहेत

Devendra Jadhav

Sana Raees Khan News: बिग बॉस 17 मधून बाहेर गेलेली आणि व्यवसायाने वकील असलेली सना रईस खानवर एका स्टायलिस्टने आरोप केले आहेत.

स्टायलिस्ट खुशबू रावतने आरोप केला आहे की, तिने सनाला रिअॅलिटी शोमध्ये दिलेले महागडे दागिने आणि कपडे परत केले नाहीत.

खुशबूने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक लांबलचक नोट लिहून सना रईस खान आणि तिच्या टीमवर आरोप केले आहेत.

स्टायलिस्टने सना खानवर कायदेशीर कारवाई केली

स्टायलिस्ट खुशबू रावतने लिहिले, "सर्वांना नमस्कार, तुमच्यापैकी अनेकांना माहित आहे की आम्ही गेल्या 4 वर्षांपासून दरवर्षी अनेक बिग बॉस स्पर्धकांसाठी कपडे खरेदी करून काम करत आहोत.

पण बिग बॉस 17 मध्ये असलेल्या सना रईस खानसोबतचा आमचा अनुभव खूपच वाईट होता. वारंवार आठवण देऊनही तिने आणि तिच्या टीमने आमचे कपडे आणि महागडे दागिने परत केलेले नाहीत.

याशिवाय ती म्हणाली, "सेलिब्रेटींना 4 वर्षांपासून कपडे पाठवत असताना, सना रईस खानसारखं स्पर्धकासारखे कोणीही वागले नाही. कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. मला आशा आहे की, सनासारख्या लोकांना चांगले दिसण्यासाठी आम्ही करत असलेले प्रयत्न तुम्हाला समजतील."

बिग बॉस 17 मध्ये तिच्या सना रईस खान विकी जैनसोबतच्या तिच्या मैत्रीमुळे चर्चेत आली होती. या रिअॅलिटी शोमध्ये सना आणि विकीचा हात धरून बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सनासोबत मुनव्वर फारुकी, अरुण मशेट्टी, अनुराग डोवाल आणि अभिषेक कुमार हे स्पर्धक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. पण सना खानचा बिग बॉसमधला प्रवास संपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT