Bigg Boss 17 Confirmed list of contestants Salman Khan hosted show Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: सुरु झाला बिग बॉसचा खेळ! आता नियम अन् अटीही बदलल्यात..घरात लॉक झाले 'हे' स्पर्धक

बिग बॉसचा 17 या सीझनमध्ये कोणकोणती नावं पाहायला मिळतील यावर एक नजर टाकूया.

Vaishali Patil

Bigg Boss 17 Contestants: टीव्हीवरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असलेल्या बिग बॉसच्या नव्या सिझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता बिग बॉसचा 17वा सीझन कालपासून सुरू झाला आहे. यंदाही या सिझनला होस्ट करण्याची जबाबदारी सलमान खानच्या खांद्यावर आहे. रविवारी मोठ्या उत्साहात बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले.

रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये 17 सेलिब्रिटी दिसणार आहेत. आता हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात 105 दिवस बंद राहणार आहे. मात्र बिग बॉसच्या 17व्या सिझनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. यावेळी घरातील स्पर्धक 'दिल, दिमाग और दम' या श्रेणीत विभागले जाणार आहेत.

शोच्या सुरुवातीलाच बिग बॉसने या तीन घरांची ओळख करून दिली. यावेळी घराची रचना युरोपीयन आहे.त्यामुळे प्रेक्षकांना या सीझनमध्ये अनेक मनोरंजक आणि नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे.

आता नेहमीप्रेमाणे या रिअॅलिटी शोमध्ये असे स्पर्धकही पाहायला मिळाले जे यापुर्वी अनेक वादांचा भाग राहिले आहेत. तर सीझनमध्ये घरात कोण कोण स्पर्धक बंद झाले आहेत त्यावर नजर टाकूया.

अंकिता लोखंडे

पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही या सीझनमध्ये सहभागी होणार अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती आता अंकिता पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या 17 व्या सिझनची स्पर्धक बनली आहे.

बऱ्याच काळापासून टीव्ही आणि लाईमलाईटपासून लांब असलेल्या अंकिताच्या एंट्रीने तिचे चाहते खुश झाले आहेत. तर अंकिता लोखंडेचा पती आणि बिझनेसमन विकी जैन देखील तिच्यासोबत बिग बॉस 17 च्या घरात लॉक झाला आहे. एमबीएची पदवी घेतलेला विकी सध्या महावीर इन्स्पायर ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक आहे.

मुन्नावर फारुकी

कॉमेडी विश्वातील सर्वात चर्चेतलं नाव मुन्नावर फारुकी देखील बिग बॉसच्या घरात बंद झाला आहे. लॉक अप शोचा विजेता असलेला मुन्नावर हा त्याच्या अटकेपासून त्याच्या लग्नापर्यंत अनेक कारणासाठी लाईमलाईटमध्ये राहिलेला आहे. त्यामुळे आता तो बिग बॉसच्या सिझनमध्ये कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मन्नारा चोप्रा

प्रियांका चोप्राच्या मामाची मुलगी असलेली मन्नारा चोप्रा ही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. ती अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. अलीकडेच ती 'थिरागाबादरा सामी' या चित्रपटामुळे चर्चेत आली. मन्नाराने 'दिल'चे घर निवडले.

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट

टीव्हीचे प्रसिद्ध जोडपे ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनीही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉस सीझन 17 मध्ये प्रवेश करणारे ते पहिले जोडपे होते.

रिंकू धवन

वादा रहा, गुप्ता ब्रदर्स, ना बोले तुम ना मैने सुना अशा अनेक लोकप्रिय शोचा भाग असलेली रिंकू धवन हिने देखील बिग बॉसच्या घरात भाग घेतला आहे.

अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय

'उदारियां' या शोमधून घराघरात पोहचलेले अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांनी देखील बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. शोदरम्यान दोघे रिलेशनशिपमध्ये होते पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. घरात प्रवेश करण्यापूर्वीच प्रीमियरमध्ये दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे आता हे स्पर्धक घरात कसे वागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

YouTuber अरुण महाशेट्टी

यूट्यूबर अरुण महाशेट्टीने बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश केला.

सनी आर्य

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला सनी आर्य यानेही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. तो व्लॉग आणि प्रँक व्हिडिओ साठी चर्चेत असतो. नेटकरी त्याला तहलका भाई म्हणून ओळखतात.

फिरोझा खान

फिरोझा खान बिग बॉस 17 मध्ये भाग घेतला. ती खानझादी म्हणून ओळखली जाते. फिरोझा एमटीव्ही हसलमध्ये दिसली आहे. ती बिग बॉस OTT 2 स्पर्धक जाद हदीदची गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जाते.

सोनिया बन्सलची बिग बॉसच्या घरात शेवटच्या क्षणी एन्ट्री झाली होती. त्यासोबतच क्रिमिनल वकील सना रईस खान आणि माजी क्राइम रिपोर्टर जिग्ना व्होरा यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. यासोबतच नावेद सोल हा बिग बॉसचा स्पर्धक आहे.

आता या 17 स्पर्धकांमध्ये कोणता स्पर्धक घरात कसा वागतो आणि प्रेक्षकांचे कसे मनोरंजन करतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT