Bigg Boss 17 Abhishek Kumar Vs Samarth Jurel  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! अभिषेक इज बॅक तर...

बिग बॉसच्या वीकेंड का वारमध्ये एकीकडे सलमान खानने सर्वांचा क्लास घेतला तर दुसरीकडे अभिषेकने शोमध्ये पुन्हा प्रवेश केला.

Vaishali Patil

Bigg Boss 17's Abhishek Kumar: कलर्स टिव्हीचा प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉसचा 17 चांगलाच चर्चेत आला आहे. घरात तुफान राडा झाला. समर्थ, अभिषेक आणि ईशा यांच्यात वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. अभिषेकने समर्थवर हात उचलला आणि बिग बॉसच्या नियमानुसार त्याला बाहेर जावे लागले होते.

अभिषेकच्या हकालपट्टीनंतर सर्वत्र त्याचीच चर्चा होती. नेटकरीच नाही तर अनेक कलाकारांनी अभिषेकला पाठिंबा दिला आणि त्याला शोमध्ये परत घेण्याची मागणी केली होती. या सगळ्या ड्राम्यानंतर आता बिग बॉसच्या घरात पुन्हा ट्विस्ट आला आहे.

बिग बॉसने कॅप्टन अंकिता लोखंडेला अभिषेकसोबत काय करायचे हा निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यावर तिने अभिषेक कुमार शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. मात्र आता सलमान खानने अभिषेकला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यापुर्वी सलमान खानने समर्थ जुरेल आणि ईशाचा चांगलाच क्लास घेतला. सलमान खानने समर्थला फटकारले. सगळ्यांना फटकारल्यानंतर सलमानने अभिषेकला पुन्हा घरात बोलावलं.

आता बिग बॉस शोच्या 'वीकेंड का वार'चा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सलमान खानने अभिषेक कुमारचे समर्थन केले आणि त्याला हाक मारली. कन्फेशन रूममध्ये बसलेल्या अभिषेकला सलमानने शिट्टी वाजवून घरात बोलावले. त्यानंतर अभिषेकची पुन्हा घरात एंट्री झाली आहे.

अभिषेक परतल्याने घरातल्यांना धक्का बसला आहे. तर ईशा आणि समर्थच्या चेहऱ्याचा रंगच उतरला. मात्र आयशा आणि मुनव्वर अभिषेकच्या परत येण्याने खुपच आंनदी दिसले. तर आता या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाणार याबाबत चर्चा होत आहे. तर ओराचा या आठवड्यात घरातील प्रवास संपेल अशी चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT