Bigg Boss 17 Upset Ankita lokhande tells husband Vicky jain heated argument SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 17: "तुला माझी गरज नाही", अंकीता पती विकीवर नाराज, दोघांमध्ये दुरावा

बिग बॉस 17 मध्ये अंकीता लोखंडे - विकी जैन हे नवरा - बायको सहभागी आहेत

Devendra Jadhav

Bigg Boss 17 Ankita Lokhande - Vicky Jain News: बिग बॉस 17 सध्या चांगलंच चर्चेत आहे. बिग बॉस सुरु होऊन आता पाच दिवस झाले आहेत. तोच घरात रुसवे फुगवे, भांडणं यांचे आवाज ऐकू येत आहेत.

बिग बॉस 17 मध्ये अंकीता लोखंडे - विकी जैन हे रिअल लाईफ नवरा बायको सहभागी आहेत. पण या दोघांच्या नात्यामध्ये बिग बॉस 17 मध्ये सुरुवातीलाच दुरावा आल्याचं समजतंय.

(Bigg Boss 17 Upset Ankita lokhande tells husband Vicky jain heated argument)

बिग बॉस 17 मध्ये नवीन प्रोमो समोर आलाय. यात विकी अंकीताला वेळ देत नसल्याने अंकिता त्याच्यावर नाराज असलेली दिसतेय. यावरून त्यांच्यात वाद झाला. नवीन लोकांना भेटल्यावर विकी तिला विसरल्याबद्दल तिने त्याला दोष दिला. विकी अंकीतासोबत बिग बॉसच्या घरात वेळ घालवत नसल्यामुळे तिला एकटेपणा जाणवत असल्याचेही तिने सांगितले.

अंकिता विकीला म्हणाली, "तू त्यांना सांगितले होते की अंकिताने हे 17 वर्षांपूर्वी हे सर्व केले आहे, पण हे सर्व तुझ्यासाठी नवीन आहे. पण जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या लोकांना कधीही मागे सोडले नाही. तुझा स्वभाव इतरांना खूश करण्याचा आहे. मी असं करत नाही. मी सुद्धा इतरांशी संवाद साधत असले तरी मी तुला विसरत नाही. मी सर्व काही एकटीच करतेय, तू माझ्यासोबत नाहीस."

अंकिता पुढे म्हणाली, "मी तुझ्यासाठी योग्य मुलगी नाहीय. मला तुझा पाठिंबा होता म्हणून मी बिग बॉसमध्ये आले. मी इथे मी एकटी पडलीय. मी तुझ्याकडून काहीही मागत नाही, पण अशा वातावरणात मी इथे टिकेन असं मला वाटत नाही. तुला माझी गरज नाही तू थांब इथे. तू इथे आनंदी आहेस. मला ही जागा आवडत नाही. मला तुला माझी कमजोरी म्हणून बघायचे नाही, मला तुला माझी ताकद म्हणून पहायचे आहे. मी कमजोर होत चालले आहे, मला मानसिक त्रास होतोय." अशा भावना व्यक्त करत अंकीताने तिच्या भावना व्यक्त केल्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Seized In Pune: पुण्यात सापडलेलं १३८ कोटींचं सोनं कोणाचं? कुठून कुठे निघाला होता टेम्पो? पोलिसांनी सगळंच सांगून टाकलं

Latest Maharashtra News Updates Live : समाजवादी पार्टीचा कार्यकर्ता आणि स्वरा भास्करचा पती फहाद अहमद वाय बी सेंटर येथे दाखल

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज

SCROLL FOR NEXT