'Bigg Boss 17': Actor Soniya Bansal gets evicted Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरात पार पडलं पहिलं एलिमिनेशन ! 'या' स्पर्धकाचा प्रवास थांबला!

Vaishali Patil

Soniya Bansal Eviction: बिग बॉस 17 हा शो सध्या चर्चेत आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शो ला सुरु होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. तर शनिवारी झालेल्या 'विकेंड का वार' मध्ये घरातून एक स्पर्धकाला बाहेर काढण्यात आलं आहे. यावेळी विकेंड का वार मध्ये सोहेल खान आणि अरबाज खान हे दोघांनी सलमान खानसोबत घरात मस्ती केली.

त्याच बरोबर घरामध्ये आणखी एका स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एंट्री करण्यात आली आहे. यात 18 म्हणजेच पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एंट्री आहे. यानंतर मनस्वी ममगाईने घरात प्रवेश केला. त्याच बरोबर ईशा मालवियचा बॉसफ्रेंड समर्थचे घरात स्वागत झाले आहे. यानंतर घरात मौनी रॉय आणि करण कुंद्राने एंट्री केली. दोघांनी स्पर्धकांसोबत गेम खेळले.

त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन पार पडलं. एका स्पर्धकाने घराला निरोप दिला आहे. सोनिया बंसल ही घरातून बेदखल झाली आहे. घरातील सदस्यांनाच सोनिया आणि सना यांच्यातून कोण घरातुन बाहेर जाईल हा निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी बऱ्याच स्पर्धकांनी सना खानला वाचवले आणि कमी मत मिळाल्यामुळे सोनियाला घरातून बाहेर जावे लागले.

बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात घरात एलिमिनेशन झाले नव्हते सर्व स्पर्धक सुरक्षित होते. तर दुसऱ्या आठवड्यात 6 स्पर्धकांना बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. त्यात यूट्यूबर तहलका,खानजादी, वकील सना रईस खान, सोनिया बन्सल, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा यांचा समावेश होता. या स्पर्धकांमध्ये सना आणि सोनिया या दोन्ही घरात कमी सक्रिय होत्या, त्यात आता सोनियाला घरातून बाहेर जावे लागले आहे.

ईशाचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल 'बिग बॉस 17' मध्ये दाखल झाल्यानंतर ईशा तिच्या अभिषेक कुमार यांच्या अडचणी वाढणार आहे. त्याचबरोबर घरात आता कोणता नवीन ड्रामा पहायला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT