Bigg Boss 17 Weekend Ka Vaar Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17 Weekend Ka Vaar: अखेर कंगनाने सलमानलाही तिच्या तालावर नाचवलचं! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Bigg Boss 17 Weekend Ka Vaar: बिग बॉस 17 हा शो आता रंगात आला आहे. स्पर्धकही आता घरात रमले आहे. एकीकडे स्पर्धकांमध्ये मैत्री होत आहे तर दुसरीकडे काहींची जोरदार भांडणदेखील होताना दिसत आहे. आज बिग बॉसच्या 17 सिझनमधील पहिला विकेंड का वार होणार आहे.

तर विकेंड का वार चे काही प्रोमो सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान शनिवारी वीकेंड का वार होस्ट करताना दिसला. यावेळी शोमध्ये गणपत स्टार क्रिती सेनेन आणि टायगर श्रॉफ पोहोचले होते. क्रिती आणि टायगरने घरातील स्पर्धकांसोबत गेम खेळला.

तर बॉलिवूडची पंगा क्विन कंगना देखील तिच्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी या शोमध्ये आली होती. यावेळी सलमान खान कंगनासोबत धमाल मस्ती करताना दिसली. इतकच नाही तर सलमान कंगनासोबत फ्लर्ट करताना दिसला.

कंगना सध्या तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच बिग बॉसच्या घरात गेली होती. यावेळी कंगना जांभळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. ती तिच्या बोल्ड अंदाजात खुपच सुंदर दिसत होती.

निर्मात्यांनी 'वीकेंड का वार'च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये कंगना सलमानची नक्कल करत शो होस्ट करताना दिसत आहे. सलमान आणि कंगना गप्पा मारताना दिसले. त्यावेळी सलमान तिला तिच्या चित्रपटातील डायलॉग बोलायला लावतो.

सलमानने कंगनाला विचारतो की जर को-स्टार तुझ्यासोबत फ्लर्ट करत असेल तर तू काय करतेस? त्यावर कंगना सांगते की ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. तर नंतर कंगना सलमानला त्याचे फ्लर्टिंग कौशल्य दाखवायला सांगते. इतकच नाही तर सलमान आणि कंगना यावेळी गरबा खेळताना दिसता. आता हा प्रोमो सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे. कंगनाने भाईजानलाही आपल्या तालावर नाचवलं असंही नेटकरी म्हणत आहे.

शनिवारी सलमान खानने सीझन 17 चा पहिला वीकेंड का वार होस्ट केला. या एपिसोडदरम्यान सलमान खानने अभिषेक कुमारसोबतच्या नात्याबद्दल ईशा मालवीयला फटकारताना दिसणार आहे. ईशाने अभिषेकवर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सलमान खान तिला रागवतो.

मन्नारा चोप्रा, नावेद सोले आणि अभिषेक कुमार हे तीन स्पर्धकांचे नॉमिनेशन झाले आहे. तर आता पहिल्याच आठवड्यात घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

Fastest double century : पाकिस्तानच्या Usman Khan ने झळकावले वेगवान द्विशतक, नावावर केला मोठा विक्रम

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT