Sonali Patil  Twitter
मनोरंजन

'प्रेक्षकांच्या मतांची किंमत नाही'; सोनालीला चाहत्यांकडून मोठा पाठिंबा

'बिग बॉस मराठी ३'च्या घरात सोनाली पुन्हा येणार का?

स्वाती वेमूल

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमधून (Bigg Boss Marathi 3) रविवारी सोनाली पाटील (Sonali Patil) बाद झाली. या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक ती होती. त्यामुळे तिच्या एलिमिनेशनवर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एलिमिनेशनमध्ये सोनालीचं नाव पाहिल्यावर सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनासुद्धा मोठा धक्का बसला. सोनाली ग्रँड फिनालेपर्यंत नक्कीच पोहोचेल, असा अनेकांना विश्वास होता. त्यामुळे बिग बॉसचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स, ट्विट करत सोनालीच्या एलिमिनेशनवर प्रश्न उपस्थित केला. 'हा पक्षपात आहे', असंही अनेकांनी म्हटलं.

'सोनाली म्हणाली होती, विनर एकच होणार आहे. मग माणूस म्हणून तरी चांगले जाऊ. मनात काहीही न ठेवता सगळ्यांची काळजी घेणारी, कितीही अडचणी आल्या तरी निखळ आनंदाने आयुष्य कसं जगायचं याचं उदाहरण,' असं ट्विट एकाने केलं. तर उत्कर्ष शिंदे आणि मीरा जगन्नाथपेक्षा सोनाली चांगली खेळते, असं दुसऱ्याने म्हटलं. सोनाली ग्रँड फिनालेमध्ये नसेल तर बिग बॉस मराठीच्या शोवर बंदी आणा, अशा शब्दांत चाहत्यांनी राग व्यक्त केला.

महेश मांजरेकर यांनी शनिवारच्या चावडीत नॉमिनेट झालेल्या ४ स्पर्धकांसाठी ४ बॅग्स पाठवल्या होत्या. विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील हे ४ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. ज्या स्पर्धकाला त्याची बॅग परत मिळणार नाही तो घरातून बाहेर जाईल, असं मांजरेकर यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे सोनालीला तिची बॅग परत मिळाली नाही आणि तिला घरातून बाहेर जावं लागलं. सोनालीने बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच आपली वेगळी छाप सोडली होती. सोशल मीडियावर तिची नेहमी चर्चा असायची. कोल्हापुरी लहेजा आणि अफलातून नृत्य कौशल्य यांनी तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. विशाल निकम आणि विकास पाटील यांच्यासोबतची तिची मैत्री आणि वाद नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत'

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? सत्ता स्थापनेपासूनच 'ऑपरेशन कमळ'चे प्रयत्न, आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

देशमुखांचं घर रिकामं होतंय... रुपाली भोसलेने शेअर केला व्हिडिओ; कुठे होत होतं 'आई कुठे...'चं शूटिंग

Kantara 2 Teaser Release: 'कांतारा २' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित; रिषभ शेट्टीचा लूक पाहून अंगावर येईल काटा

SCROLL FOR NEXT