Bigg Boss Marathi 4 amruta dhongade and tejaswini lonari planning for task  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: खुल्ला करायचा राडा.. अमृता- तेजस्विनीची नवी खेळी..

आजच्या टास्कमध्ये होणार राडा, एकमेकांना हरवण्यासाठी गाठणार टोक..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास जसजसा पुढे जात आहे, तसं तसे अवघड आणि अत्यंत कठीण टास्क पुढे येत आहेत. आता तर सदस्यांना डोकं, ताकद सगळंच वापरावं लागणार आहे. आज बिग बॉस यांनी "खुल्ला करायचा राडा" हे कार्य सदस्यांवर सोपवले आहे. आणि त्याचसाठी तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी खेळी आखताना दिसणार आहेत.

(Bigg Boss Marathi 4 amruta dhongade and tejaswini lonari planning for task )

बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता चार आठवडे झाले. टास्क, वाद भांडण आणि राडे यांचे सत्र सुरूच आहे. कुरघोडी, एकमेकांवर गेम करणे हे सुरूच आहे. सध्या बिग बॉसच्या घरात स्नेहलता वसईकरची वाइल्ड कार्ड एंट्री झाली असल्याने नवे समीकरण तयार होत आहे. या आठवड्याच्या शेवटी कदाचित दोन टीमच्या तीन टीम झालेल्या दिसतील. प्रत्येकजण स्वतःची वेगळी खेळी खेळत आहे. यामध्ये आता अमृता धोंगडेची टीम जरा कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे अमृता आणि तेजस्विनी अपूर्वा नेमळेकरच्या टीमला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी खेळी ते आज खेळणार आहेत.

तेजस्विनी अमृताला सांगताना दिसणार आहे, 'आता सगळं सामान इकडेतिकडे आहे. तू जे तेल बोलते ना ते वापरूया पण... अमृता म्हणाली, आतून सामान आणण्यासाठी आपण यशश्रीला ठेवण्याचा प्रयत्न करूया. तेजस्विनीचे म्हणणे आहे, खाली कोणी तरी लागणार आत वेगळा माणूस नाही जाऊ शकतं. अमृताचे म्हणणे आहे, तू नसशील तेव्हा मी असेनच ना आणि मग तू संचालक व्हायचं. कोण आत जाणार ? कोण सामान आणणार ? कोण टार्गेट करणार ? याविषयीच्या चर्चा दोघींमध्ये सुरू आहेत. त्यामुळे टास्क जिंकण्याच्या दृष्टीने त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT