Bigg Boss Marathi 4 day 4 chance pe dance task with garba night  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: 'चान्स पे डान्स' उपकार्यात स्पर्धकांना मिळणारं सरप्राइज काय असेल?

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचे चौथे पर्व 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. ‘बिग बॉस’च्या तीन हिट पर्वानंतर सर्वचजण चौथे पर्व कधी सुरू होणार याची वाट पाहत होते. अखेर रविवारी 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. पण पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडलेली दिसली. सध्या घरात प्रसाद जवादे, अपूर्वा नेमळेकर, अक्षय, अमृता अशा काही स्पर्धकांनी कंबर कसल्याने एकदम अटीतटीचा सामना आहे. त्यामुळे वाद, भांडण हे स्वाभाविकच आहे. पण आजच्या म्हणजे ६ ऑक्टोबरच्या भागात केवळ वाद नाही तर फुल्ल टू मनोरंजन मिळणार आहे. त्याचे कारणही खास आहे.

अपूर्वा आणि प्रसादमधील वाद काल विकोपाला गेला, दोघे एक मतावर येऊ शकले नाही, दोघेही आपल्या मुद्द्यावर अडून राहिल्याने साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य अनिर्णित राहिले. पण कालपासून घरामध्ये सुरु झाले आहे “चान्स पे डान्स” हे उपकार्य. किरण माने आणि निखिल राजेशिर्के या कार्याचे संचालक आहेत. काल अक्षय केळकर आणि प्रसाद यांच्या सादरीकरणाने खूपच धम्माल आणली. आज सदस्य कोणकोणत्या गाण्यावर डान्स करतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

त्यामुळे आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वादासोबतच काल धम्माल मस्ती देखील बघायला मिळणार आहे. आज विकास आणि यशश्री वो लडकी आख मारे या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करणार आहेत. तर आज घरामध्ये रंगणार आहे BB गरबा नाईट. यामध्ये सदस्य एक से बडेकर एक गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहेत. सदस्य या गरबा नाईटमध्ये डान्सचा मनसोक्त आनंद लुटता दिसणार आहेत. घरामध्ये BB गरबा नाईटचा जल्लोष तर असेलच पण सदस्यांना एक खास सरप्राईझ देखील मिळणार ? काय असेल ते सरप्राईझ ? ते आजच्या भागात कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका; एकाचा मृत्यू, वडगाव शेरीतील घटना

IND vs BAN 1st Test: भारताने चौथ्याच दिवशी बांगलादेशला केलं पराभूत! शतक अन् ५ विकेट्स घेणारा अश्विन विजयाचा शिल्पकार

Raj Thackeray: "पाकिस्तानी कलाकारांना नाचवणं..."; फवाद खानचा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

MBBS and BDS : एमबीबीएस, बीडीएसची दुसरी फेरी शुक्रवारपासून; पहिल्‍या फेरीनंतर अवघ्या काही जागा रिक्‍त

भयंकर अपघातातून वाचला अन् मेहनतीने केले पुनरागमन; Rishabh pant बद्दल काय म्हणाला Shubman Gill ?

SCROLL FOR NEXT