Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या पर्वात कॅप्टन होण्यासाठी स्पर्धकांमध्ये प्रचंड चढाओढ असते. त्यामुळे कॅप्टनसी कार्यात पुढे राहण्यासाठी स्पर्धक वाटेल ते करतात. कारण कॅप्टन होणं म्हणजे घरात एक आठवडा मुक्काम फिक्स, शिवाय अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची ताकद मिळते. बिग बॉस मराठीच्या घरात नुकतेच 'लगोरी' ही कॅप्टनसी कार्य पार पडले. समृद्धी जाधव कॅप्टनपदी विराजमान झाली, पण कॅप्टन झाल्या आल्या तिने असा निर्णय घेतला की सगळे तिच्याकडे बघतच राहिले.
(Bigg Boss Marathi 4 once again samruddhi jadhav is caption)
गेली चार आठवडे सुरू असलेला हा बिग बॉसचा खेळ चांगलाच रंगत आहे. नुकतेच या घरात कॅप्टनसी टास्क पार पडले आणि समृद्धी जाधव कॅप्टनपदी विराजमान झाली. विशेष म्हणजे समृद्धी दुसऱ्यांदा कॅप्टन झाली आहे. बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टन होण्याचा मान तिनेच पटकावला होता. मात्र यावेळी तिने कॅप्टन झाल्या झाल्या एक मोठा निर्णय घेतला त्याने सर्वजन चकीत जाले.
कॅप्टन झाल्या झाल्या समृद्धीवर एक महत्वाची जाबबादरी बिगबॉसने दिली. खरं तर बिगबॉस ने तिला एक निर्णय घेण्यास सांगितला. ज्यामध्ये बिग बॉस घरामध्ये रोज एक स्वीट डिश म्हणजेच गोडाच पदार्थ दिला जाईल, पण तो केवळ एकच व्यक्ती खाऊ शकते. तो कुणी खायचा हे मात्र कॅप्टन म्हणजेच समृद्धीने ठरवायचे आहे.
यावेळी समृद्धी पुढे मोठा पेच पडतो. सर्वांना वाटतं की तिच्या टीम पैकी कुणाचे तरी नाव घेईल. त्यातही अपूर्वाचे नाव घेईल कारण तिला गोड खूप आवडतं. पण समृद्धी अचानक यशश्रीचे नाव जाहीर करते आणि सर्वांना धक्काच बसतो. कारण यशश्री तिच्या विरोधी टीममध्ये असूनही समृद्धी तिचे नाव घेते. पण त्यावर समृद्धी म्हणजे कॅप्टनसी कार्यात टी माझी प्रतिस्पर्धी होती. तीही तितक्याच ताकदीने खेळली. त्यामुळे या गोड पदार्थवर तिचाच हक्क आहे. हा निर्णय ऐकून सर्वांनाच समृद्धीचा हेवा वाटतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.