Bigg Boss OTT 2: Elvish Yadav getting support from Canada based gangster Goldy Brar?  Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: 'एल्विशला उगाच त्रास देऊ नको नाहीतर..' सलमानला थेट गोल्डी ब्रारनेचं दिली धमकी? ट्विट व्हायरल

Vaishali Patil

Elvish Yadav getting support from Canada based gangster Goldy Brar? : बिग बॉस OTT 2 च्या चाहत्यांना खूप आवडत आहे. स्पर्धक शोमध्ये रोजच नवनवे ड्रामा करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजनही होत आहे. विकेंडला सलमानने या शोमध्ये आणखी रंगत आणली. यावेळचा विकेंड का वार खुपच गाजला त्याला कारण ठरला तो एल्विश यादव.

या 'विकेंड का वार'मध्ये होस्ट सलमान खानने एल्विश यादवला फटकारलं. सलमानने यात एल्विश यादवसोबतच फुक्रा इन्सान आणि मनीषा राणी यांचाही क्लास घेतला. एल्विशने जिया शंकरवर एक अश्लील टिप्पणी केली, त्यानंतर सलमान खानने वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याच्या आईला कॉल लावला.

आईला पाहिल्यानंतर एल्विशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो ढसाढसा रडला. सलमानचं एल्विशला रागावणं आणि त्याचं रडणं हे त्याच्या चाहत्यांना मुळीच आवडलं नाही.

एल्विशला सपोर्ट करत अनेकांनी सोशल मिडियावर सलमान खान खुप ट्रोल केलं. सोशल मीडियावर सलमान ट्रेंड करत होता आणि नेटकरी त्याला ट्रोल करायला लागले.

मात्र आता प्रकरण इतक वाढलं की सलमान खानला आता थेट त्याचा कट्टर शत्रू गोल्डी ब्रारनेच धमकी दिली आहे. गोल्डी ब्रार हा तोच आहे ज्याने यापुर्वी सलमानला मारण्याची धमकी दिली आहे.

सलमानला इमेल करत त्याने धमकी दिली होती. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. आता सोशल मिडियावर एक ट्विट व्हायरल होत आहे जे गोल्डी ब्रारने केलेलं आहे अशी चर्चा आहे.

या ट्विटमध्ये गोल्डी ब्रारने एल्विश यादवला पाठिंबा दिला आहे. तर सलमानला थेट धमकी दिली आहे. गोल्डीचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने लिहिलं की, 'बिग बॉसच्या घरात एल्विशला त्रास देण्यात येत आहे आणि त्याचा बदला घेण्याची माझी जबाबदारी आहे.'

गोल्डीने ट्विटमध्ये सलमान खानबद्दल अपशब्द वापरले आहेत. त्याला थेट मारण्याची आणि बदला घेण्याची धमकी यात दिली आहे. आता सलमानचं हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मात्र सोशल मिडियावर व्हायरल होत असलेलं हे ट्विट गोल्डी ब्रारनेचं केलं आहे का याची अधिकृत पृष्ठी झालेली नाही. गुंड असलेल्या गोल्डीचे सोशल मीडिया हँडल लोकांना माहीत नाही

गोल्डी ब्रार बद्दल सांगायचं झालं तर त्याने लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरुन पंजाबी गायक सिद्धू मूसवालाचा दिवसाढवळ्या खून केला होता. आता त्यात या ट्विटनं पुन्हा सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT