Bigg Boss OTT 2: Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: पुजा भट्टने केलं पलकसोबत भांडण! मात्र नेटकऱ्यांचाच चढला पारा, म्हणाले..

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2: 17 जुनपासून सुरु झालेला बिग बॉस ओटीटी सिझन आता त्याच्या रंगात आला आहे. सुरवातीच्या दिवसापासूनच हा सिझन चर्चेत राहिला. पहिल्याच दिवशी शो मधुन पुनित सुपस्टारला बिग बॉसने घराबाहेर काढले.

आता त्यातच आणखी काही स्पर्धकांमध्ये वाद विवाद सुरु झाले आहेत. आता घरातील काही स्पर्धक अगदी शिताफीने हा गेम खेळत आहेत तर काहींना अजून हे शिकायचे आहे. दरम्यान शोमधले स्पर्धकांबद्दल प्रेक्षक सोशल मिडियावरही आपआपल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

पूजा भट्टने व्हीव्हीआयपी म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे. ती घरातील पहिली स्पर्धक ठरली, त्यामुळे पूजाला अनेक सुविधा मिळाल्या आहेत. मेकर्सच्या या कृतीमुळे पूजा भट्टही ट्रोल झाली होती. आता पुन्हा पूजा भट्ट ही प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे.

गुरुवारी रात्रीच्या एपिसोडमध्ये पूजाने मनीषा राणी आणि जेडी हदीद यांच्यातील गैरसमज दुर केला. त्यातच पलक पुरस्वानी आणि जिया शंकर यांना सुनावतांना पुजाने तिची नवी मैत्रीण मनीषाचं भरभरुन कौतुक केले. ती म्हणाला की मनीषा या दोघांपेक्षा जास्त समजूतदार आहे कारण ती बिहारमधील एका छोट्या शहरातील होती .

जेल टास्क दरम्यान, मनीषा राणीने जैदसाठी पगलेट हा शब्द वापरला. ज्यामुळे घरात बराच गोंधळ झाला. यादरम्यान पूजाने मनीषाला पाठिंबा दिला आणि जैदला पगलेटचा अर्थ सांगितला. दरम्यान पलकने मनिषा खुप हूशार असून चतुराईने हा गेम खेळत असल्याचं सांगितलं. मात्र पूजा भट्टला काही हे पटलं नाही त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला

पुजा भट्ट खुपच आक्रमक पावित्रा घेतला, जे पाहत पलक थक्क होते. पलक तिच्या बचावात बोलतांना दिसते मात्र पूजा तिला बोलूच देत नाही. विषेश म्हणजे याआधीही पुजा पलकला टार्गेट करतांना दिसली होती. आता तर पुजाने पलकला दिलेली ही वागणूक काही प्रेक्षकांना खुप खटकली आहे. तर पुजाने पलकला चांगलच उत्तर दिल्यांचही काही नेटकऱ्यांना वाटत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT