Bigg Boss OTT 2: Elvish Yadav getting support from Canada based gangster Goldy Brar?Bigg Boss Ott 2 Elvish Army  Esakal
मनोरंजन

Bigg Boss Ott 2 : एल्विशला फटकारणं भाईजानला पडलं चांगलच महागात! बसला मोठा फटका

Vaishali Patil

Bigg Boss Ott 2 Elvish Army: 'बिग बॉस ओटीटी 2' सध्या खुपच चर्चेत आलं आहे. आता काहीच स्पर्धक या शोमध्ये उरले आहेत. त्यात वाईल्ड कार्ड एंट्रीत घरात आलेला एल्विश यादव सगळ्या घराला त्याच्या बोटावर नाचवत आहे. त्याने घरात येताच घराचा ताबा मिळवला आणि चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. तो घरात येताच बाकिच्या स्पर्धकांच्या लोकप्रियतेत खुपच घट झाली.

मात्र तो शोमध्ये त्याच्या बोलण्याने आणि वागण्यामुळे प्रेक्षकांची मन जिंकत असतांना काहीवेळा भानही सोडतो. असं काहीस त्याचं आणि बेबिकासोबत भांडण झाल्यावर घडलं. त्यानंतर 'विकेंड का वार' मध्ये सलमानने त्याचा चांगलाच क्लास घेतला.

सलमान शो होस्ट करत असल्याने त्याने मागच्या काही क्लिप दाखवल्या आणि त्यानंतर एल्विश आणि अभिषेकला चांगलचं फटकारलं आहे. सलमानने यावेळी एल्विश आर्मीवरही निशाणा साधला होता.

मात्र एल्विशला रागावणं भाईजानला चांगलचं महागात पडल्याचं दिसत आहे. 'विकेंड का वार' संपल्यानंतर ट्विटरवर सलमान ट्रेडिंग करु लागला. एल्विशचे चाहते त्याला खुपच ट्रोल करु लागले.

तर दुसऱ्याच दिवशी सलमान खानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाल्याचं चित्र दिसत आहे.

सलमानच्या इंस्टावर 66.8 मिलियन फॉलोअर्स होते, परंतु एल्विश यादवसोबत झालेल्या वादानंतर त्याचे फॉलोअर्स थेट 63.7 दशलक्षांवर आला आहे. त्याचबरोबर त्याला सातत्याने सलमानला ट्रोलही केलं जात आहे.

त्यातच एक स्क्रीनशॉट देखील व्हायरल होत आहे जो सलमानचा शत्रू गोल्डी ब्रारच्या ट्विटचा असल्याच्या चर्चा आहे. यामध्ये सलमाननं एल्विशला रागावल्याबद्दल गोल्डी याचा बदला घेणार असल्याचं सांगितलं. मात्र हे ट्विट त्याचं असल्याची अधिकृत असल्याची माहिती नाही. एल्विशच्या चाहत्यांनी त्यालाच बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता घोषित केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Fact Check : मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करा! 'मविआ'कडे संघटनांनी अट ठेवल्याचा 'तो' दावा खोटा

Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

SCROLL FOR NEXT