IPL चे पहिले फाऊंडर ललित मोदी(Lalit Modi) यांच्यावर लवकरच सिनेमा येतोय. याविषयीची माहिती ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श(Taran Adarsh) यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या सिनेमाची निर्मिती '83' आणि 'थलाइवी'चे निर्माते विष्णु वर्धन इंदुरी करणार आहेत. हा सिनेमा स्पोर्ट जर्नलिस्ट बोरिया मुजूमदार यांच्या ललित मोदीवर लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमासाठी अद्याप कलाकारांची निवड केली गेली नाही.
ललित मोदीने IPLची सुरुवात केली होती. २००५ ते २०१० पर्यंत ललित मोदी BCCI चे व्हाइस प्रेसिडेंट होते. २००८ ते २०१० मध्ये ते IPLचे चेअरमन आणि कमिश्नर होते. २०१० मध्ये ललित मोदींना एका घोटाळ्या प्रकरणी IPL कमिश्नर पदावरुन काढून टाकण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त त्यांना BCCI मधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मनी लॉन्ड्रिंग केसमधील आरोपांअंतर्गत २०१० मध्ये ललित मोदी देशातून फरार झाले होते. ललित मोदीवरील बायोपीकमध्ये त्यांच्या आयुष्यातील कॉन्ट्रोवर्सीला पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया, ललित मोदींच्या आयुष्यातील कॉन्ट्रोवर्सीविषयी.
आयपीएलची सुरुवात झाल्यावर ललित मोदी यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना IPL मध्ये सहभागी करुन घेतलं होतं,ज्यामाध्यमातून पैशाची अफरातफर बरीच मोठी घडून आली होती. यासोबतच असे अनेक घोटाळे केले ज्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांना जास्तीत जास्त फायदा होईल याकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं. २००८ मध्ये आयपीएल हा नवा प्रकार क्रिकेट जगतात आला अन् सुपरहिट झाला. आणि यामुळे ललित मोदीची खूप प्रशंसाही झाली. आयपीएल मुळे केवळ क्रिकेटप्रेमींची नाहीच तर किकेटर्स आणि BCCI ला देखील अधिक फायदा होऊ लागला. यानंतर ललित मोदी यांनी चॅंपियन्स लीगच्या ऑडिओवर काम करण्यास सुरुवात केली जो प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही.
ज्यानंतर काही वर्षांनी IPLआणि ललित मोदींचे त्यातील गैरप्रकार हळूहळू समोर यायला लागले आणि त्यानंतर २०१० मध्ये IPL च्या फायनल नंतर BCCI च्या व्हाइस प्रेसिडंट पदावरुन हटवलं गेलं. माहितीनुसार,BCCIने ललित मोदीवर तब्बल २२ आरोप लावले होते,ज्यामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच कॉन्ट्रॅक्ट देणं,आयपीएल च्या ब्रॉडकास्टिंगला आपल्या फायद्यासाठी वापरणं आणि अशा कितीतरी बाबतीत केलेल्या घोटाळ्यांचे आरोप यात सामिल आहेत. दिल्लीच्या मोठ्या व्यावसायिक पार्श्वभुमी असलेल्या कुटुंबात ललित मोदी यांचा जन्म झाला. अमेरिकेत ललित मोदी यांनी आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर ललित मोदी यांनी इथलं क्रिकेट वेड पाहिलं. आणि अमेरिकेतील खेळांपासून प्रेरणा घेऊन आलेल्या ललित मोदी यांनी भारतात आयपीएल सुरु करण्याचा विचार केला . हिमाचल,राजस्थान,पंजाब क्रिकेट असोसिएशनचं सदस्य बनल्यानंतर BCCI सोबत मिळून ललित मोदीनी आयपीएलच्या प्लॅनवर काम सुरु केलं.
परदेशात शिक्षण घेऊन आलेल्या ललित मोदींचे विचार इतके पुढारले की त्यांनी आपल्या आईच्या मैत्रिणीशीच लग्न केलं. मिनल या ललित मोदींपेक्षा ९ वर्षानं मोठ्या होत्या. तरीदेखील या दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि ललित मोदी यांनी प्रेमाची जाहिर कबुली मिनल यांच्याकडे दिली. ज्यानंतर मिनल ललित मोदींवर खुप रागावल्या होत्या. त्यांनी चार वर्ष त्यांच्याशी बोलणं देखील बंद केलं होतं. मिनलनं नायजेरियन असलेल्या सागरानी यांच्याशी विवाह केला. पण ते लग्न फार काळ टिकलं नाही,त्यांचा घटस्फोट झाला. आणि त्यानंतर मिनल ललित मोदींच्या अधिक जवळ आल्या. आणि कुटुंबाचा विरोध होऊन देखील ललित मोदी यांनी १७ ऑक्टोबर १९९१ रोजी मिनलशी लग्न केलं. अशा प्रकारे ललित मोदी यांच्या वैयक्ति आणि आयपीएल घोटाळ्यांवर आधारित हा बायोपिक पाहण्यास क्रिकेटवेडा प्रेक्षक नक्कीच आतुर असेल.
बॉलीवूड मध्ये दर दोन-तीन वर्षात एखादा तरी असा सिनेमा प्रदर्शित होतो की जो क्रिकेटशी संबंधित असतो. गेल्याच वर्षी ८३ प्रदर्शित झाला होता,जो भारतानं १९८३ साली जिंकलेल्या वर्ल्डकप वर आधारित आहे. आता २२ एप्रिलला शाहिद कपूरचा जर्सी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. झूलन गोस्वामीवर आधारित चकदा एक्सप्रेस हा क्रिकेटवर आधारित सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.