sai pallavi 
मनोरंजन

वाढदिवस विशेष :  साई पल्लवी म्हणजे सौंदर्याची नवी व्याख्या

जयपाल गायकवाड

'प्रेमम' हा मल्याळम चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला आणि 'मलर'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवीचा मुरुमाने भरलेला चेहरा पाहून ही अभिनेत्री म्हणून शोभते का? असा प्रश्न अनेक लोकांना पडला होता. मात्र सर्वांचे अंदाज फोल ठरवत साई पल्लवी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. गोरा रंग, नितळ त्वचा अशा सौंदर्याच्या तथाकथित व्याख्यांना छेद  देत तिनं नैसर्गिक सौंदर्याला प्राधान्य दिलं. त्यामुळेच चेहऱ्यावर मुरूमा असताना मेक-अपनं ती त्या लपवत नाही उलट त्यालाच ती नैसर्गिक सौंदर्य मानते. 'प्रेमम' चित्रपटातही तिनं मेक-अप केला नव्हता.

एका कथेत असे सांगितले जाते की एका 'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! परमेश्वर म्हणाला 'का?' स्त्री म्हणाली 'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते....." असं कुण्या प्रतिथयश लेखकानं लिहून ठेवलयं. ज्यांनी लिहिलंय, ज्या काळात लिहिलंय तो त्यांच्या अनुभव कक्षेचा भाग झाला.

पण सौंदर्याची परिमाणं धुंडाळली तर ती शरीराशी निगडीत आहेत अस मला कधीच जाणवलेलं नाही.

व्यक्ती परत्वे ती बदलतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ‘साैंदर्य’ ही बाब फक्त शरिराशी निगडीत कधीच नव्हती. चरबट व नफेखोर व्यवस्थेने तिला तितकीच कृत्रिम/विकाऊ परिमाणं लावली म्हणून ती जपली गेली. पोसली गेली म्हणणे जास्त योग्य. त्यातही पुरूषांच्या दृष्टीकोनाचे निकष त्याला इतके चिकटलेत की स्त्रियाही तेच प्रमाण मानून चालत आल्या. ज्या महिलांनी हे निकष झुगारले त्यांनी मात्र इतिहास घडवलाय हे नक्की. चित्रपट सृष्टी म्हणजे सुंदर बालांचा वावर हे समीकरणही अनेक अभिनेत्रींनी झुगारून टाकले आहे.

दक्षिणेतील अभिनेत्री साई पल्लवी जिचा मुरुमाने भरलेल्या चेहरा, तेलकट चेहरा, मेकअप नसलेली अभिनेत्री म्हणूनच ओळख झाली आहे. तिने तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. सध्या ती टॉलीवूड मध्येआघाडीच्या अभिनेत्री मध्ये स्थान निर्माण केले आहे.

एका मुलाखतीत साई पल्लवीने हे स्पष्ट केले की ते मुरुम नाही आणि तो (Rosacea) एक स्किनचा आजार आहे.जेव्हा मी कॅमेरा आणि प्रकाशात येते तेव्हा माझा चेहरा गुलाबी होतो असे तिने सांगितले होते. या आजाराला वैद्यकीय शब्दात Rosacea असे म्हटले जाते त्वचेच्या खालच्या स्तरांतील केशवाहिन्या बराच काळ प्रसरण पावल्यामुळे गाल आणि नाक फुललेली दिसतात. तिच्या चेहऱ्यावरील मुरूम दिसण्यावरून टॉलीवूड मध्ये मोठी चर्चा झाली होती मात्र तिच्या अभिनय आणि डान्स मुळे आता सर्वांचे तोंड बंद झाले आहेत. 

साईचे पूर्ण नाव साई पल्लवी संतमराय आहे. तिचे वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण झाले असून २०१५ साली "प्रेमम" या मल्याळम चित्रपटातून तिचे पदार्पण झाले. या चित्रपटातील मलारची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाले होते.. त्यासोबतच २०१७ मध्ये अभिनेता वरुण तेज सोबतचा "फिदा" तेलुगू चित्रपटाने तर नवीन रेकॉर्ड केला आहे. ह्यानंतर मिडल क्लास अब्बायी, धनुष्य सोबत मारी २, पडी पडी लेचे मनसु, एनजीके असे हिट चित्रपट केले आहेत. 

चित्रपटात येण्यापूर्वी ती २००८ मध्ये विजय टीव्ही वरील प्रभू देवाच्या डान्स शो मध्ये सहभाग घेतला होता, २००९ मध्ये ईटीव्ही तेलुगू चॅनेलवर प्रसिद्ध असलेल्या डान्स शो मध्ये ती विजेता ठरली आणि तेंव्हा पासून चित्रपट क्षेत्राशी संबंध वाढला. ती कोरियोग्राफर म्हणून तिची ओळख निर्माण झाली होती. त्यासोबतच आपले वैयकिय शिक्षण चालूच ठेवले होते. अभिनेत्री कधी होईल याची तिला अपेक्षा नव्हती अचानक मिळालेल्या संधी मुळे कोरियोग्राफरची अभिनेत्री बनली. साई पल्लवीला अवघ्या कमी कालावधीत अत्यंत प्रतिष्टेचे असलेलं दोन फिल्म फेअर अवॉर्ड आणि SIIMA अवॉर्ड मिळवला आहे.

एका मुलाखतीत साई पल्ल्वी म्हणाली, 'जेव्हा प्रेक्षकांनी मला माझ्या चेहऱ्यावरील मुरुमांसह स्वीकारलं, मी जशी दिसते तसं स्वीकारलं त्यावेळी मला जाणीव झाली की आत्मविश्वास हेच तुमचं खरं सौंदर्य आहे. ' प्रत्येकाने स्वतःबद्दल आणि आपल्या रंगाबद्दल आत्मविश्वास बाळगायला हवा अशी भूमिका साई नेहमीच घेताना दिसते. त्यामुळेच, तिनं गेल्यावर्षी एका  'फेअरनेस क्रीम'च्या तब्बल २ कोटींच्या जाहिरातीला नकार दिला होता आणि आता तिनं आत्मविश्वास हेच तुमचं खरं सौंदर्य आहे असं सांगत स्वत:च्या रंग-रुपाचा न्यूनगंड बाळगणाऱ्या अनेक मुलींना सौंदर्याची नवी व्याख्या दिली आहे.

birthday special sai pallavi is a new defination of beauty

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT