Marathi Actress Priya Berde esakal
मनोरंजन

Priya Berde : आतापर्यंत अनेकांनी कलाक्षेत्राकडं दुर्लक्ष केलं, पण भाजपनं कलाकारांना न्याय दिला; मराठी अभिनेत्रीचं मोठं विधान

राज्यात आजवर आलेल्या अनेक सरकारांनी कलाक्षेत्राला दुर्लक्षित केले.

सकाळ डिजिटल टीम

राजकारणामध्ये कोणतीही अपेक्षा नाही; फक्त कलाकार जगला पाहिजे, हीच भावना आहे.

सांगली : राज्यात आजवर आलेल्या अनेक सरकारांनी कलाक्षेत्राला दुर्लक्षित केले. भाजपने मात्र कला आणि कलाकारांना न्याय दिला. कोरोना काळात कलाकारांचे हाल झाले. लोककलाकारांची अवस्था नाजूक होती. अशा कलाकारांना किमान जगण्यापुरते तरी मानधन मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन भाजप सांस्कृतिक विभागाच्या राज्याध्यक्ष प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी येथे केले.

सांगली जिल्हा सांस्कृतीक विभागाच्या वतीने (Cultural Department) नवदुर्गा पुरस्कार (Navdurga Award) व विविध स्पर्धा पुरस्कार वितरण अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ, माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, महिला राज्य उपाध्यक्षा स्वाती शिंदे, सांस्कृतिक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक नरेंद्र आमले, सहसंयोजक अपर्णा गोसावी, माणिक जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Marathi Actress Priya Berde

बेर्डे म्हणाल्या, ‘‘राजकारणाचा कोणताही अनुभव नाही, मात्र कलाकारांच्या व्यथा आणि समस्यांसाठी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. राजकारणामध्ये कोणतीही अपेक्षा नाही; फक्त कलाकार जगला पाहिजे, हीच भावना आहे. वृद्ध कलाकारांना पेन्शनची मागणी आहेच; पण सर्वच कलाकारांना प्रतिमहिना मानधनही मिळाले पाहिजे, रोज काम मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’’

विश्वनाथ जोशी यांनी स्वागत केले. सचिन पारेख यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेविका ऊर्मिला बेलवलकर, गीतांजली ढोपे-पाटील, अपर्णा पटवर्धन, तृप्ती पाटील, रश्मी सावंत, आरती आपटे यांच्यासह पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.

सुमन जाधव (जीवन गौरव), वैशाली खरे (नाट्य अभिनेत्री), भाग्यश्री जोशी (बालनाट्य लेखन), माया पवार (शॉर्ट फिल्म), सौ. स्वाती मुळे (नृत्य), सौ. वैशाली पाटील (कला विभाग), गौरी वनारसे (गायन), ऋतुजा गोखले (भाषा विदुषी), प्रतिभा जगदाळे (साहित्य), रश्मी फलटणकर (गायन) यांना नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले. कलाक्षेत्रात काम करणारे तृतीयपंथी अमोल जाधव यांनाही पुरस्कार देण्यात आला.

‘कलाकारांसाठी चित्रपट सोडले’

‘‘राजकारणामध्ये येताच अनेक चित्रपट सोडले. कलाकारांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. कलाकार जगला पाहिजे हीच भावना आहे. कलाक्षेत्राला भाजपमुळे न्याय मिळाला आहे. आता महिलांना आरक्षणही मिळाले आहे. प्रत्येक महिलेने देवीची नऊ रुपे घेऊन बिनधास्तपणे समाजामध्ये वावरले पाहिजे. त्या नक्कीच चांगले काम करुन दाखवतील,’’ असा विश्‍वासही प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT