bjp leader chandrakant patil watch subhedar movie ajay purkar digpal lanjekar at pune SAKAL
मनोरंजन

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांनी पाहिला सुभेदार, दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकसाठी भक्कम पाठिंबा

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सुभेदार सिनेमा पाहून त्यांचा अनुभव सांगितला

Devendra Jadhav

सुभेदार सिनेमा अजुनही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल सुरु आहे. सुभेदार सिनेमा पाहायला लहान मुलांपासुन सामान्य माणसांपर्यंत सगळेजण गर्दी करत आहेत.

सुभेदार सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षक गर्दी करत आहेत. समोर शाहरुखचा जवान सिनेमा असुनही सुभेदारने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केलीय. अशातच भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सुभेदार सिनेमा पाहिला आहे.

(bjp leader chandrakant patil watch subhedar movie ajay purkar digpal lanjekar at pune)

चंद्रकांत पाटील यांनी पाहिला सुभेदार

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी काल पुण्यात त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत 'सुभेदार' चित्रपट पाहिला. चंद्रकांत पाटील यांना सुभेदार सिनेमा पाहून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचं कौतुक केलंय.

शिवराज अष्टकमध्ये एकुण ५ सिनेमे झाले. यापैकी पहिला सिनेमा म्हणजे 'फर्जंद'. फर्जंद पासूनच मा. चंद्रकांतदादांचे बहुमोल सहकार्य 'श्री शिवराज अष्टक' या चित्रपट मालिकेला लाभत आहे. त्यामुळे आता सुभेदार पाहून चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलंय. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवप्रतिमा भेट देऊन चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले

सुभेदार सिनेमाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी कामगिरी

सुभेदार सिनेमाचा सिनेमागृहात यशस्वी चौथा आठवडा सुरु झालाय. सुभेदार सिनेमाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केलीय.

sacnilk च्या अहवालानुसार, सुभेदारने आतापर्यंत १५ कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याची शक्यता आहे. जवानच्या रिलीजमुळे सुभेदारला फटका बसला असला तरीही सुभेदार सिनेमागृहात ठाण मांडून आहे. मराठी प्रेक्षक सुभेदार सिनेमाला पसंती दर्शवत आहे.

सुभेदार मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज

शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' यानंतर 'सुभेदार' हा पाचवा भाग शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प आहे.

सुभेदार सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT