BJP MP actress Hema Malini Reacts On Manipur Violence Against Women viral  Esakal
मनोरंजन

Manipur Violence: 'मणिपूरमधलं कृत्य घृणास्पद अन् ..' भाजप खासदार हेमा मालिनींची प्रतिक्रिया..

Vaishali Patil

Hema Malini Reacts On Manipur Violence: देशाच्या मणिपूर राज्यातुन एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला अन् दशभरातस संतापाची लाट उसळली. मणिपूरमधील कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला होता. देशभरातून या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

या घटनेच्या विरोधात देशभरातुन अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया होती. याच प्रकराणावर आता भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, 'मणिपूरमध्ये जे घडलं ते घृणास्पद आहे. या ऐकल्यानंतर घृणा येते. महिलांच्या बाबतीत असं होऊ नये, यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले आहे. विरोधक नेहमी पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलतात. त्याचे ते कामचं की मोदींनी काहीही केले की त्याचा विरोध करायचा.'

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर भलतेच चर्चेत आले आहे.

अनेक कलाकारांनी या घटनेचा तिखट शब्दात निषेध केला आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कलाकरांनी केली आहे.

यात अक्षय कुमार , प्रियांका चोप्रा, उर्मिला मातोंडकर, संजय दत्त, कियारा अडवाणी, एकता कपूर, जया बच्चन, रिचा चढ्ढा, रेणुका शहाणे, रितेश देशमुख यांच्यासह सोनाली कुलकर्णी, स्वानंदी किरकिरे , हेमंत ढोमे आणि अनेक मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. कलाकारांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कडक कारवाई मागणी केली आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केल्याची माहिती दिली. आम्ही कोणालाही सोडणार नाही. सत्ताधारी भाजपचे सर्व आमदार या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT