Jailer on OTT News: रजनीकांतच्या जेलर सिनेमा सुपर डुपरहिट झाला. थैलवा रजनीकांतची जादू भारतात नव्हे तर जगभरात पसरली. रजनीकांत सुद्धा जेलर यशस्वी झाल्याने खुप खुश आहे.
रजनीकांतचा जेलर अनेकांनी पाहिला तर काहींना पाहता आला नाही. पण ज्यांना पाहता आला नाही त्यांनी निराश व्हायचं कारण नाही. जेलर आता OTT वर रिलीज होणार आहे. कुठे? कधी? आम्ही तुम्हाला सांगतो.
(Blockbuster Jailer rajinikanth OTT release date)
रजनीकांतचा जेलर या तारखेपासुन OTT वर पाहा
रजनीकांतचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जेलर' 7 सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. शनिवारी, ओटीटी प्लॅटफॉर्मने जेलरचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले, "जेलर येत आहे, अलर्ट मोड सक्रिय करण्याची वेळ आली आहे! #JailorOnPrime, 7 सप्टेंबर."
अशी हटके पोस्ट करत सर्वांना ही माहिती दिली. जेलर प्राईमवर हिंदी, तामिळ सह विविध भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. रजनीकांतचा जेलर OTT वर घरबसल्या पाहायला मिळणार असल्याने थलैवाचे फॅन्स खुश आहेत.
जेलरमधील तो आक्षेपार्ह्य सीन काढून टाकला
एकीकडे जेलर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होत असतांना दुसरीकडे हा सिनेमा वादात देखील अडकला होता. या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेण्यात आला होता.
खरं तर, चित्रपटाच्या एका दृश्यात एक कॉन्ट्रॅक्ट किलर आरसीबीच्या जर्सीत दाखवण्यात आला होता. या सीनमुळे मोठा वाद सुरु झाला होता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं.
आता यावर सुनावणी करत हायकोर्टाने चित्रपटाच्या निर्मात्यांना 1 सप्टेंबरपर्यंत चित्रपटातील त्या सीनमधून आरसीबीची जर्सी काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
रजनीकांतने जेलरची सक्सेस पार्टी केली साजरी
10 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या जेलरने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 300 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले आहेत. चाहत्यांसोबतच रजनीकांतही आपल्या चित्रपटाच्या यशाने खूश आहेत. नुकतंच त्याने हे यश साजरं केलंय.
रजनीकांत यांनी 'जेलर'च्या टीमसोबत केक कापून धूमधडाक्यात सेलिब्रेशन केले. रजनीकांतच्या जेलरने 2023 मधील तमिळ सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रजनीकांतच्या जेलरने 'पोनियिन सेल्वन 2'लाही मागे टाकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.