Bohemia Popular Punjabi Rapper Saga Music Delhi High Court esakal
मनोरंजन

Bohemia Rapper : प्रसिद्ध पंजाबी रॅपर बोहेमिया अडचणीत, दिल्ली उच्च न्यायालयानं दिला मोठा आदेश! 'यापुढे बोहेमियाला...'

प्रसिद्ध पंजाबी गायक, रॅपर बोहेमिया (Bohemia Popular Punjabi Rapper) हा अडचणीत सापडल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Bohemia Popular Punjabi Rapper Saga Music Delhi High Court : प्रसिद्ध पंजाबी गायक, रॅपर बोहेमिया (Bohemia Popular Punjabi Rapper) हा अडचणीत सापडल्याचे दिसून आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं त्याच्या (Delhi High Court News) विरोधात दिलेल्या आदेशानं बोहेमियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशामुळे यापुढील काळात न्यायालयाच्या परवानगी शिवाय परफॉर्म करता येणार नाही.

हायकोर्टानं सागा म्युझिकनं बोहेमियाच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आदेश दिला आहे. त्या आदेशानंतर बोहेमियाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सागा म्युझिक कंपनीनं (Saga Music Company) बोहेमियानं आपण त्याच्याशी जो करार केला होता त्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. Bohemia can not perform without permission of Saga Music

कोर्टानं आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे, बोहेमिया आणि त्याच्याशी (Bohemia Rapper Song) जोडल्या गेलेल्या व्यक्तींनी याचिकाकर्त्यांवर कोणतेही आरोप करु नये, तसेच त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारे अपमानकारक वक्तव्य करु नये. यामुळे केवळ बोहेमियाच नाही तर (Bohemia Popular Song) बाकीच्या लोकांना देखील या प्रकरणासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे.

सध्या जे प्रकरण कोर्टात सुरु आहे ते २०१९ पासून उच्च न्यायालयात सुरु आहे. सागा म्युझिकनं बोहेमियावर आरोप केला आहे की, रॅपर सोबत जे काही झाले त्यात त्यानं जो करार केला होता त्याचे त्यानं उल्लंघन केले आहे.

सागा म्युझिकच्या वतीनं असं सांगण्यात आले आहे की, बोहेमिया सोबत आमचा करार झाला होता. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की, तो आमच्यासोबत ४५ महिने काम करेल. त्या दरम्यान तो अन्य कोणत्या गायकासोबत किंवा कंपनीशी करार -काम करणार नाही. यासोबत आम्ही जो करार केला होता त्यात असेही म्हटले होते की, बोहेमियाची सर्व गाणी, व्हिडिओ आणि परफॉर्मन्स वर आयपीआर (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स) यावर सागा म्युझिकचा अधिकार असेल.

सागा म्युझिकनं हे सगळे आरोप बोहेमियावर केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यानं या सगळ्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यानं अटी आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT