Bollywood: Aamir Khan reveals about his struggling days and stardom Instagram
मनोरंजन

Aamir Khan: स्टारडम मिळूनही अडचणीत होता आमिर; म्हणाला,'माझं जगणं मुश्किल झालं होतं...'

एका मुलाखतीत आमिर खाननं आपलं स्ट्रगल ते स्टारडम पर्यंतच्या प्रवासाावर बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Aamir Khan: मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलीवूडमध्ये ओळखला जाणारा आमिर खान आज स्टार आहे, पण एक काळ होता जेव्हा इंडस्ट्रीशी संबंधित कुटुंबातला असूनही त्याच्या वाट्याला स्ट्रगल आलं होतं. पण आमिरनं कठीण परिश्रमांनी आज इंडस्ट्रीत टॉपचं स्थान पटकावलं आहे. एका मुलाखतीत आमिर खाननं स्ट्रगलिंग डेज ते स्टारडम मिळवेपर्यंतचा आपल्या प्रवासाविषयी भाष्य केलं आहे. आमिर खाननं या मुलाखतीत आपल्या पहिल्या मानधनाविषयी देखील खुलासा केला आहे.

आमिरनं सांगितलं की 'कयामत से कयामत तक' मध्ये काम करण्यासाठी त्याला १००० रुपये मिळाले होते. आमिर खाननं या सिनेमातून मुख्य भमिका साकारत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याआधी आमिर खाननं बालकलाकार म्हणूनही काही सिनेमात काम केलं होतं. आमिर खानचा कयामत से कयामत तक हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला होता. आमिर खान स्टार बनण्यात या सिनेमाचं मोठं योगदान आहे. या सिनेमाच्या रिलीजनंतर आमिर खान रातोरात स्टार बनला.(Bollywood: Aamir Khan reveals about his struggling days and Stardom)

आमिर खान मुलाखतीत म्हणाला- ''मी अॅवॉर्ड्सचा कधीच विचार करत नाही. हे म्हणणं कदाचित योग्य नसेल पण अॅवॉर्ड्सविषयी नेहमीच माझ्या मनात डाऊट येत राहिला आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात फार आदर नाही. किंवा तो जिंकणं माझ्यासाठी फार मोठा आठवणीतला क्षण वगैरे तर मुळीच नाही. पण माझा सिनेमा बनून तयार होणं हा क्षण मात्र माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण असतो. 'कयामत से कयामत तक' सिनेमाच्या वेळी मी मन्सूर अली खान यांच्या सिनेमाचा केवळ अभिनेता नव्हतो,तर सहाय्यक दिग्दर्शकही होतो. त्यावेळी मला मिळालेले १००० रुपये माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती''.

कयामत से कयामत तक रिलीज झाल्यानंतर आमिरचं नशीबच बदललं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आमिर त्या सिनेमानंतर स्टार झाला होता. तो म्हणाला-''सिनेमा तेव्हा रिलीज झाल्यानंतर केवळ तरुण मंडळीच नाहीत तर सर्वच वयोगटातील लोकांची गर्दी थिएटरमध्ये दिसू लागली. लोकांनी संपू्र्ण कुटुंबासोबत त्यावेळी तो सिनेमा एन्जॉय केला. मी तेव्हा शॉकमध्ये होतो. मला वाटलेलं माझं काम ठीकठाक झालं आहे''.

''मला जुही आणि मन्सूरचं काम आवडलं होतं. पण माझं काम तितकसं आवडलं नव्हतं. पण सिनेमा सुपरहिट राहिला आणि मी रातोरात स्टार झालो. मला त्यावेळी स्टारडमचा फारसा अर्थ कळत नव्हता. पण गोष्टी बदलू लागल्या होत्या. कारण माझ्यासाठी तेव्हा प्रवास करणं कठीण झालं होतं. लोक मला ओळखू लागले होते. तेव्हा मी एक जुनी गाडी खरेदी केली,पण तरिही लोक मला ओळखायचे.त्यामुळे रस्ता ब्लॉक व्हायचा. स्टारडमचं वादळ माझ्याभोवती घोंघावू लागलं होतं''.

''जेव्हा मी दिल्लीला जायचो,हॉटेलमध्ये थांबायचो. तेव्हा जसा मी हॉटेलच्या रुममध्ये जायचो,लगेच फोन वाजायचा. सुरुवातीला ऑपरेटर बोलायचा आणि त्यानंतर मग संपूर्ण स्टाफ माझ्याशी बोलायचा आणि इतकंच नाही त्यांची कुटुंब देखील मला भेटायला यायची. तेव्हा माझं जगणं कठीण झालं होतं. हे सगळं पाहून मी अक्षरशः घाबरायचो. कारण मी तसा लाजाळू होतो. माझी इतकी कोणी प्रशंसा केल्यावर नेमकं रिअॅक्ट कसं व्हायचं मला कळायचं नाही''.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

आमिर खानच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर सध्या आमिरनं सिनेमातून ब्रेक घेतला आहे. त्याला आता त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे. आमिर खान आपल्याला काजोलच्या 'सलाम वेंकी' मध्ये कॅमियो रोल साकारताना दिसणार आहे. ९ डिसेंबरला हा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT