Entertainment News: मनोरंजन विश्वात आपल्या वेगळ्या भूमिकेनं लक्ष वेधून घेणारा चित्रपट म्हणजे बॉब बिश्वास. हटके कल्पना, संवाद, प्रभावी दिग्दर्शन असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. बॉब बिस्वासची व्यक्तिरेखा साकारताना अभिषेक बच्चन म्हणतो, “सुजॉयने या चित्रपटाच्या पट कथेवर (Bob Biswas) माझ्याशी चर्चा केली असली, तरी मी या पट कथेत पूर्ण गुंतून गेलो होतो”. कोलकात्याच्या रस्त्यावर तुम्हाला अचानक भेटणारा तो तुमचा मित्र असू शकतो, ज्याच्याबरोबर तुम्ही आपला डबा खाता तो तुमचा सहकारी असू शकतो, तो (Bollywood Movies) तुम्हाला सर्वकाही ठीक आहे, असे सांगेल किंवा अचानक आपल्या बॅगेतून एक पिस्तुल काढेल- वरकरणी रूप फसवे असते! 11 जून रोजी रात्री 10.00 वाजता ‘अॅण्ड पिक्चर्स’वर पाहा अनिश्चिततेने भरलेली विस्मृतीचा रोग (Tv Entertainmement News) जडलेल्या एका खतरनाक कॉन्ट्रॅक्ट किलरची कथा ‘बॉब बिस्वास’मध्ये. हरहुन्नरी अभिषेक बच्चनला बॉब बिस्वासच्या रूपात पाहताना थरारकता आणि गूढरम्यतेच्या विश्वात हरवून जा.
मूळ चित्रपटातील एखाद्या दुय्यम व्यक्तिरेखेला मुख्य व्यक्तिरेखा बनवून नवा चित्रपट तयार करण्याची संकल्पना भारतात नवी आहे. बॉब बिस्वास हा असाच नव्या प्रकारचा चित्रपट आहे. त्यामुळे तो स्वीकारताना तू कोणता विचार केला होता?
भारतीय चित्रपटसृष्टीत दुय्यम व्यक्तिरेखेला मुख्य व्यक्तिरेखा बनवून नवा चित्रपट तयार करण्याची संकल्पना नवी असली, तरी बॉबची व्यक्तिरेखा असा संपूर्ण चित्रपट तयार करण्याइतकी सशक्त आहे. सुजॉयने या चित्रपटाच्या पटकथेवर माझ्याशी चर्चा केली असली, तरी मी या पटकथेत पूर्ण गुंतून गेलो होतो आणि माझ्या मनात हा चित्रपट करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी विद्या बालनचा कहानी हा चित्रपट पाहिला नव्हता त्यामुळे बॉब बिस्वासबद्दल मला फार मर्यादित माहिती होती. पण बॉबची व्यक्तिरेखा उभी करताना मला हे अज्ञानच उपयोगी ठरलं. हा स्पिन-ऑफ चित्रपट खरं तर आधीपासूनच अपेक्षित होता, कारण कहानीमधील बॉबच्या अगदी छोट्या प्रवेशाने त्याच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण केली होती. दिवसा साधा विमा एजंट म्हणून काम करणारा आणि पत्नी व दोन मुलं असं कुटुंब असलेला हा माणूस रात्री सुपारी घेऊन मारेकर््याचं काम करील ही कल्पनाच अगदी अनोखी होती. या व्यक्तिरेखेच्या या अनपेक्षित स्वभाववैशिष्ट्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवील. अशी ही विलक्षण स्वभावच्छटा आणि गूढ व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारण्यात दिग्दर्शिका दियाने उत्तम कामगिरी केली आहे.
या चित्रपटावर अप्रतिम परीक्षणं प्रसिध्द झाली आहेत. त्यासंबंधी तुझे काय विचार आहेत?
या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. तुमच्या अभिनयगुणांचा कस लावतील अशा भूमिका साकारण्याची तुम्ही वाट पाहात असता आणि त्यानंतर तुम्ही आणखी नवी क्षितिजं धुंडाळत राहता. बॉब बिस्वासमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवील अशी एखादी अनोखी व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम काम करीत होती. बॉब हा तसा मितभाषी आहे. त्यामुळे त्यातील नाट्यपूर्णता दर्शविण्यासाठी अचूकता महत्त्वाची होती. माझ्यातील अभिनयगुणांना या भूमिकेने चांगलेच कंगोरे पाडले असून पटकथा आणि व्यक्तिरेखा समजून घेण्यास मला या चित्रपटामुळे खूपच मदत झाली.
ही भूमिका साकारण्यासाठी तुला आपलं वजन वाढवावं लागलं होतं. ते तू कसं साध्य केलंस ते सांग.
जी व्यक्तिरेखा साकारायची, तसा जर मी पडद्यावर दिसलो, तर 50 टक्के काम होतं, असं माझं मत आहे. त्यामुळे कोणत्याही चित्रपटात माझा सुरुवातीचा भर हा माझ्या व्यक्तिरेखेप्रमाणे मी दिसण्यावर असतो. बॉब बिस्वासमध्ये मला बॉब दिसण्यासाठी माझं वजन 100 किलो तरी असायलाच हवं होतं. यासाठी मी प्रोस्थेस्टिक्सचा नक्कीच वापर केला असला, तरी जर तुमचं शारीरिक वजनच तितकं असेल, तर तुमच्या कामगिरीवरही त्याचा तसाच प्रभाव पडतो, असं मला वाटतं. तुमची देहबोली, तुमचं चालणं-वावरणं, फिरणं-धावणं वगैरे सर्वच गोष्टी बदलतात. प्रोस्थेस्टिक्समुळे या गोष्टी जमत नाहीत. वजन वाढविताना मला खूप मजा आली. विशेषत: थंडीच्या दिवसांत आम्ही कोलकात्यात गुड संदेश या मिठाईवर ताव मारीत असू. पण लॉकडाऊनमुळे आम्हाला मध्येच चित्रीकरण थांबवावं लागलं. पण चित्रीकरण थांबलं, तरी या मधल्या काळात मला माझं वाढलेलं वजन तसंच टिकवूनही धरावं लागत होतं. 100 किलोवर वजन कायम ठेवायचं ही कठीण गोष्ट होती. पण तुमच्या चित्रपटासाठी आणि तुमच्या भूमिकेसाठी तुम्हाला जे करावं लागतं, ते केलंच पाहिजे. त्यामुळे मी ते निभावून नेलं.
इतक्या तरूण दिग्दर्शिकेबरोबर काम करताना कसं वाटलं?
दिया ही प्रचंड गुणी दिग्दर्शिका आहे. किंबहुना तिचे वडील सुजॉयपेक्षाही ती गुणी आहे, असं मी म्हणेन. प्रत्येक प्रसंगात तिला नेमकं काय हवंय, ते तिला अचूक ठाऊक असतं. इतक्या लहान वयात तिने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने, त्यातही पहिल्याच चित्रपटाने, इतके प्रेक्षक मिळविणं ही नक्कीच मोठी कामगिरी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.