Amitabh Bachchan Is Force To Sell His Luxurious Car: बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. वयाची 78 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा उत्साह अदयाप कमी झालेला नाही. नव्या अभिनेत्यांना सतत प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणून अमिताभ यांच्या नावाचा (Entertainment News) उल्लेख करावा लागेल. आपल्याला कदाचित अमिताभ यांच्याबद्दल एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे त्यांना महागडया कार घेण्याचा मोठा शौक आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये अशा अनेक कार आहेत. सध्या सोशल (Social media viral news) मीडियावर त्या कारसंबंधी एक बातमी व्हायरल होताना दिसत आहे. ती म्हणजे अमिताभ यांना आपल्या कलेक्शनमधील त्या आवडत्या कार कवडीमोल भावात विकाव्या लागल्या आहेत.
असं काय कारण होतं की, अमिताभ यांना कमी किंमतीत त्या गाड्या विकाव्या (Amitabh Bachchan) लागल्या. ते आपण जाणून घेणार आहोत. मुंबईमध्ये अमिताभ यांच्याजवळ दोनपेक्षा अधिक बंगले आणि फ्लॅट्स आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे (bollywood actor) असलेल्या गाड्यांची संख्याही जास्त आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणाऱ्या अमिताभ यांना पुन्हा चर्चेत यावं लागलं आहे. त्यांनी त्यांच्या ताफ्यातील महागड्या गाड्या एवढ्या कमी किंमतीत कशा विकल्या, याबद्दल त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. अमिताभ यांच्याकडे मर्सिडिज, रेंज रोव्हर, बेंटले जीटी, मिनि कुपर, यासारख्या कारचे कलेक्शन आहे. या गाड्या त्यांनी अतिशय कमी किंमतीत देण्याचा निर्णय घेतला आहे.
खरं तर अमिताभ यांच्याजवळ असलेल्या एस क्लास मर्सिडिजला तीस लाखांमध्ये विकावी लागली आहे. मीडिया रिपोर्टस नुसार या गाडीला 14 वर्ष झाली आहेत. आणि 15 वर्षानंतर त्या कारचे पुन्हा नुतनीकरण करावे लागते. म्हणून बिग बी यांनी त्या गाड्या विक्रीसाठी काढल्या आहेत. असे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी आपल्याकडील रॉल्स रॉयस फँटमची विक्री केली होती. ही गाड़ी फिल्म मेकर विधु विनोद चोप्रानं 2007 मध्ये एकलव्य चित्रपटाच्या वेळी दिली होती. अमिताभनं ती गाडी म्हैसुरमधील एका व्यापाऱ्याला विकली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.