sangeet devbabhali : गेल्या काही वर्षात व्यावसायिक रंगभूमीवर आलेले 'संगीत देवबाभळी' हे नाटक रोज नवा विक्रम रचत आहे. या नाटकाने नाट्य स्पर्धांमध्ये तर बाजी मारलीच शिवाय काही दिवसांपूर्वीच 'साहित्य अकादमी' पुरस्कार या नाटकाला प्राप्त झाला.
विशेष म्हणजे हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या 'बीए' अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आले आहे. विजया मेहता, स्व. जयंत पवार , डॅा. राजीव नाईक, सतीश आळेकर, नसिरुद्दीन शाह, परेश रावल, दिलीप प्रभावळकरअशा अनेक दिग्गजांनी या नाटकाला गौरवले आहे.
सध्या या नाटकाचे शेवटचे काही प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज या नाटकाला आवर्जून हजेरी लावत आहेत. नुकतीच या नाटकाला बॉलीवुड अभिनेते बोमन इराणी यांनी हजेरी लावली..
यावेळी ते अक्षरशः भारावून गेले, त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते देवबाभळी नाटकाचे कौतुक करत आहेत.
( bollywood actor boman irani feeling happy and amazed after watching sangeet devbabhali marathi drama writer prajakt deshmukh viral video)
'मुन्नाभाई', 'थ्री इडियटस्' अशा दर्जेदार चित्रपटातून दमदार भूमिका साकारणा अभिनेता म्हणजे बोमन इराणी. आज बॉलीवुडमध्ये अभिनयात त्यांचा हात धरणारं कुणीही नाही. ते स्वतः रंगकर्मी आहेत.
त्यांनी अनेक हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषिक नाटकात भूमिका केल्या आहेत. त्यामुळे नाटकाविषयी त्यांना प्रचंड ओढ आहे. नुकत्याच झालेल्या 'संगीत देवबाभळी'च्या (sangeet devbabhali) प्रयोगाला ते उपस्थित होत. यावेळी नाटक पाहून ते अवाक झाले.
हा प्रयोग पाहून बोमन इराणी म्हणाले की, 'हा अनुभव डोळे दिपवणारा होता. या नाटकाविषयी मला काहीच माहीत नव्हतं, प्राजक्तच्या एका शब्दावर मी नाटक पाहायला आलो. मग इथे आल्यावर थोडा रिसर्च केला, मग मला नाटकाचा आशय, विषय, इतिहास, त्या घडलेल्या घटना यांचा अंदाज आला.'
'हे नाटक पाहून अक्षरशः भारावून गेलो. म्हणजे प्रकाशयोजना, संगीत, ध्वनी संयोजन सगळं अफाट होतं.पण या नाटकातील दोन असे घटक हे संगळ्याच्या पलीकडे जातात ते म्हणजे नाटकाचे लेखन आणि सादरकर्त्या दोन अभिनेत्री..'
'ज्या पद्धतीने त्यांनी ने नाटक पेललं आहे, ते वाखणण्याजोगं आहे, कुठेही काहीही म्हणजे एकाही जागा त्या चुकू देत नाहीत. त्या अभिनय करतात, गातात, नाचतात पण कुठेही चुकत नाहीत.'
'ना कुठे शब्द चुकत, ना सूर, ना ताल, ना पायाचा ठेका.. त्या केवळ अभिनय करत नाहीत तर त्या स्टेजवर वावरतात, कपडे धुतात, भाकरी करतात आणि हे सगळं सुरू असतानाच हे नाटक घडत असतं.. हे पाहून मी थक्क झालो.. विशेष म्हणजे मला खूप काही शिकायला मिळालं..' अशा भावना बोमान इराणी यांनी व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.