The kashmir files 
मनोरंजन

'गुजरात दंगलीवरील चित्रपटाला कुत्रंही गेलं नसतं' KRK संतापला

बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे कायम त्यांच्या (Bollywood Movies) वादग्रस्त स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत.

सकाळ डिजिटल टीम

The Kashmir Files: बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे कायम त्यांच्या (Bollywood Movies) वादग्रस्त स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावाभोवती (Kamal Rashid Khan) वाद हा चिकटलेला आहे. त्यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत, (Kangana Ranaut) स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, तापसी पन्नु या सेलिब्रेटींची नावं (Bollywood News) सांगता येतील. सध्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मिर फाईल्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याची चर्चा आहे. त्यामध्ये पल्लवी जोशी,अनुमप खेर, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिषेक अग्रवाल यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी या चित्रपटाचे कौतूक केले आहे. Bollywood movies kashmir files box office collection 7 core

यासगळ्यात बॉलीवूडच्या एका अभिनेत्याला द काश्मीर फाईल्स हा काही पचलेला, आवडलेला नाही. त्यानं त्यावरुन संताप व्यक्त केला आहे. त्या अभिने्त्याचे नाव आहे कमाल राशिद खान अर्थात केआरके खान. त्यानं द काश्मीर फाईल्सवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी त्यानं याच चित्रपटाचा विषय घेऊन कपिल शर्मावर टीका केली होती. कपिलचं नाव घेऊन त्यानं 25 लाख रुपयांची मागणी केली आणि काश्मीर फाईल्सचं प्रमोशन करतो असे सांगितले होते. ही बाब सोशल मीडियावरुन व्हायरल केली होती. त्याच्या त्या पोस्टवरुन केआरकेला ट्रोल करण्यात आले होते. आता केआकेनं द काश्मिर फाईल्सवरुन कडवट प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

11 मार्चला जगभरात प्रदर्शित झालेल्या द काश्मिर फाईल्सनं चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यावरुन केआरके म्हणतो, गुजरात दंगल आणि गोध्रा हत्याकांडावर चित्रपट निर्मिती केली असती तर कुत्रंही ते पाहायला गेलं नसतं. एकीकडे द काश्मीर फाईल्सवर कौतूकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे अशाप्रकारचे वक्तव्य करुन कमाल खाननं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कमाल खाननं सोशल मीडियावर एक व्टिट केलं आहे. त्यामध्ये तो म्हणतो, द काश्मीर फाईल्सनं दुसऱ्या दिवशी साडेसात कोटींचा व्यवसाय केला आहे. तो सुपरहिट झाला आहे. मात्र अशाचप्रकारे गुजरात दंगलीच्या विषयावर चित्रपट तयार केला असता तर कुत्रंही तो चित्रपट पाहायला गेलं नसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT