Bloody Daddy Shahid Kapoor Teaser News: अभिनेता शाहिद कपूरने फर्जी या पहिल्याच वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. आता शाहिदच्या आगामी सिनेमाची उत्सुकता होती. हा सिनेमा म्हणजे ब्लडी डॅडी.
शाहिदच्या ब्लडी डॅडी सिनेमाचा खतरनाक टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या टिझरमध्ये शाहिदच्या आजवर कधीही न पाहिलेला भयंकर अवतार पाहायला मिळतोय.
(bollywood actor shahid kapoor new movie bloody daddy teaser out now)
हेही वाचा: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
काहीच दिवसांपूर्वी शाहिदची वेब सिरीज 'फर्जी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती आणि आता त्याचा 'ब्लडी डॅडी' हा सिनेमाही ओटीटीवर रिलीज होणार आहे.
शाहिद कपूरच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर रिलीज पाहून अंगाचा थरकाप उडेल. या चित्रपटाने जोरदार खळबळ उडाली आहे.
टीझरमध्ये शाहिद कपूर अतिशय रागीट अवतारात दिसत आहे. हातात चाकू घेऊन तो शत्रूंना मारत सुटलाय.
‘ब्लडी डॅडी’मधील शाहिद कपूरचा हा रफ-अँड-टफ अवतार पाहणं हा त्याच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे. शाहिदने आतापर्यंतच्या करियरमध्ये अशी भूमिका केलेली नाही. 'ब्लडी डॅडी'च्या टीझरला अल्पवधीतच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चाहते खूप कौतुक करत आहेत आणि शाहिदची तुलना थेट हॉलिवूडपट जॉन विकशी करत आहेत. हा सिनेमा जरी OTT वर रिलीज होणार असला तरीही हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे.
'ब्लडी डॅडी'च्या टीझरमध्ये शाहिद कपूर सूट-बूटमध्ये आरशासमोर उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. सुरुवातीला तो एक सज्जन माणूस दिसतो.
मात्र बाहेर येऊन हातात चाकू काढताच त्याचे भयावह रूप पाहायला मिळते. लोकांना कापणारे, हवेत फेकणारे 'किलिंग मशीन' म्हणून शाहिद कपूरची नवी ओळख दिसते.
'ब्लडी डॅडी'मध्ये भरपूर अॅक्शन आणि भरपूर स्टंट यांचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमात शाहिद सोबतच संजय कपूर, रोनित रॉय, डायना पेंटी असे कलाकार पाहायला मिळणार आहेत.
हा सिनेमा कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे तरीही ९ जूनला हा सिनेमा OTT वर रिलीज होतोय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.