shriram nene 
मनोरंजन

कुटूंब वाचवायचंय? माधुरी दीक्षितच्या पतीनं सांगितला 'रामबाण' उपाय

कोरोनाचं (corona) संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - कोरोनाचं (corona) संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहे. अशावेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी देशपातळीवरुन प्रयत्न होत आहेत. दोन वर्षांपासून सुरु असणाऱ्या कोरोनाच्या काळात कित्येकांना आपला जीव गमवावा लागल्याचे दिसून आले आहे. लसीकरण (vaccination) करुनही अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. आता तर ओमीक्रॉ़न (omicron) नावाचा वेगळा व्हेरियंट (varient) सापडल्यान अनेकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे त्याला सामोरं कसं जायचं हा सर्वांसमोर प्रश्न आहे. यासगळ्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या पतीनं डॉ. श्रीराम नेने यांनी एक पर्याय सुचवला आहे. त्याची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

नेने यांनी सोशल मीडियावर (social media) लिहिलं आहे की, आपल्यासमोरील संकट दिवसेंदिवस अधिक बिकट होत चाललं आहे. त्याचा परिणाम आपल्याला दिसूनही आलं आहे. अशावेळी काय करावं. हा सगळ्यासमोरील मुख्य प्रश्न आहे. आपल्याला आणखी मोठ्या पद्धतीनं विचार करावा लागेल. कोरोनानं आपल्याला सोशल आयसोलेट केलं आहे. मात्र आपण त्याचा सामना करताना आणखी किती नात्यामध्ये कटूता आणायची याचाही विचार केला पाहिजे. सोशल बबलचा पर्याय आहे. मात्र केवळ मोठी घरं असून काय फायदा नाही. यासगळ्यात आपलं कुटूंब आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे.

येणाऱ्या काळात अधिक निरोगी आणि परिपूर्ण राहायचं असल्यास त्यासाठी आपल्याला सोशल बबल्सचा विचार करावा लागेल. आणि कौटूंबिकता जपावी लागेल. सध्याच्या काळात अशाप्रकारे विचार केल्यासच आपला निभाव लागेल. ही गोष्ट श्रीराम नेने यांनी यावेळी आवर्जुन सांगितली आहे. आपली माणसं ही आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षाही जास्त मोलाची आहेत. अशावेळी आपण त्यांना जपलं पाहिजे. हेही लक्षात ठेवण्याची गरज असल्याचे नेने म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT