Actress Rekha  esakal
मनोरंजन

रेखाला सगळं काही मिळालं, तरीही एका गोष्टीवाचून झुरणं संपेना!

सौंदर्य आणि अभिनय यांचा अनोखा संगम असणारी अभिनेत्री म्हणून चाहत्यांच्या पसंतीची अभिनेत्री असणाऱ्या रेखा यांचा बॉलीवूडमधील प्रवास सोपा नव्हता.

युगंधर ताजणे

Rekha Love Affairs: सौंदर्य आणि अभिनय यांचा अनोखा संगम असणारी अभिनेत्री म्हणून चाहत्यांच्या पसंतीची अभिनेत्री असणाऱ्या रेखा यांचा बॉलीवूडमधील प्रवास सोपा नव्हता. या अभिनेत्रीच्या वाट्याला मोठा संघर्ष आला.(bollywood actress) अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून अपमानित झालेल्या रेखा यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत आहेत. त्यात त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा अनेकदा उल्लेख आला आहे. रेखा यांनी त्यांच्या (Rekha Love Affiars) अभिनयापेक्षा रिलेशनशिपवरुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या त्या वेगवेगळ्या रियॅलिटी शो मधून आपल्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा देताना दिसतात.

रेखा या कुंकू लावतात पण ते कुणाच्या नावाचं हे त्यांनी जाहिरपणे सांगितलेलं (bollywood news) नाही. मात्र त्यावरुन सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाली आहे. रेखा यांचं वय 67 वर्षे आहे. त्यांना बॉलीवूडमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. त्यांनी अभिनेत्री ते खासदार असा प्रवास पार केला आहे. त्या प्रवासात त्यांना अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगांना सामना करावा लागला आहे. रेखा यांचे अमिताभ बच्चन, विनोद मेहरा, अक्षय कुमार, संजय दत्त, जितेंद्र, नवीन निश्चल यांच्यासोबत नाव जोडले गेले होते. मात्र यासगळ्यात त्यांची चर्चा अमिताभ यांच्याबरोबर जेव्हा झाली ती आजतागायत लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

रेखा यांना लहानपणीच वडिलांच्या प्रेमाला पारखं व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रेखा यांनी जिद्दीनं आणि संघर्षातनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रियताही मिळाली. रेखा यांच्या पर्सनल लाईफविषयी जेव्हा बोलले जाते तेव्हा पहिल्यांदा त्यांचे नाव अमिताभ यांच्याशी जोडले जाते. एक काळ असा होता की, अमिताभ यांनी रेखा यांच्या नात्यानं बॉलीवूडचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र अमिताभ यांच्याशिवाय त्या अनेक अभिनेत्यांच्या प्रेमात होत्या हे अनेकांना माहिती नाही.

सावन भादो या चित्रपटापासून रेखा यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. यावेळी त्या चित्रपटाचे अभिनेते नवीन निश्चल यांच्यासोबत रेखा यांचे नाव जोडले गेले होते. मात्र ते नातं काही फार काळ टिकलं नाही. त्यानंतर रेखा यांची जवळीक अभिनेता जितेंद्र यांच्याशी जोडले गेले होते. जितेंद्र यांच्यावर रेखा प्रेम करु लागल्या होत्या. मात्र जितेंद्र यांनी शोभा यांच्याशी विवाह केल्यानं त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.

रेखा यांचे अमिताभ यांच्याशी जेव्हा नाव जोडले गेले तेव्हा त्याची मोठी चर्चा झाली होती. असं म्हटलं जातं की, अमिताभ देखील रेखावर फिदा होते. मात्र जया बच्चन यांची इंट्री होताच त्या रिलेशनला ब्रेक लागला. रेखा यांचे जितके अफेअर्स होते त्यातील एकही नातं लग्नात रुपांतरीत झालं नाही. याची खंत त्यांना नेहमीच राहिली. ती त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vidhansabha Election : पुण्यात पुन्हा धंगेकर विरूद्ध रासने! विधानसभेला भाजपकडून जुन्याच चेहऱ्यांना संधी

IND vs NZ Test: ४३३१ दिवस, १२ वर्षे अन् १८ मालिका... अखेर टीम इंडिया मायदेशात हरले! एकदा आकडेवारी पाहाच

Murlidhar Mohol on Manoj Jarange : जरांगे पाटलांचा राग फडणवीसांवर नाही तर... मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले

राज ठाकरेंसोबत माझी तुलना कधी होऊ शकत नाही कारण... अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या वडिलांविषयी भावना

Vasai Assembly Election 2024 : वसईत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ...

SCROLL FOR NEXT