Bollywood Actress Tabbu Birthday News: तब्बूविषयी जेवढं बोलावं अन् सांगावं तेवढं कमी आहे. तिनं नेहमीच तिच्या भूमिकांमधून तिचे वेगळेपण सिद्ध केले आहे. एकाच धाटणीचे चित्रपट न करता वेगवेगळया भूमिका करुन तिनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. तब्बूला राष्ट्रीय पुरस्कारानं देखील गौरविण्यात आले आहे. आज तिच्या जन्मदिनानिमित्त काही गोष्टी जाणून घेऊयात.
बॉलीवूडमध्ये आजही काही सेलिब्रेटींच्या प्रेमप्रकरणांचे किस्से रंगवून सांगितले जातात. ते सेलिब्रेटी जेव्हा आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी रियॅलिटी शोमध्ये जातात तेव्हा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी (Bollywood Actor) त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं केली जातात. सध्या बॉलीवूडमध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यानिमित्तानं त्या चित्रपटातील कलावंत कपिल शर्मा च्या शोमध्ये येवून आपल्या (Ajay Devgn) चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतात. त्यातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं आपल्याला अजुनही अजयमुळेच सिंगल राहावे लागल्याची खंत व्यक्त केली आहे.
अजय देवगण हा जसा त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या सोशल मीडियावरील अॅक्टिव्हनेससाठी देखील चर्चेत असतो. 90 च्या दशकांत (Bollywood movies) बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्याला फुल और काटेपासून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्याचे वडिल वीरु देवगण हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या अजयचा प्रवास दमदारपणे सुरु असल्याचे दिसून आले आहे. अजयनं काजोलसोबत लग्न केलं. त्यांचा प्रेमविवाह. प्यार तो होना ही था पासून त्यांच्या लवस्टोरीला सुरुवात झाली होती. मात्र त्यापूर्वी अजय हा एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता. ती अभिनेत्री देखील त्याच्या प्रेमात होती. तो आपल्याशी लग्न करेल असे तिला वाटत होते. ते काही शक्य झालं नाही. पुढे तीच अभिनेत्री साऊथच्या नागार्जुनच्या प्रेमात पडली होती.
आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव आहे तब्बु. त्या अभिनेत्रीनं तीन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा भुलभलैय्या 2 चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे. तब्बुनं यापूर्वी अनेक मुलाखतींमधून अजय आणि तिच्या प्रेमाविषयीचे किस्से सांगितले होते. आपण अजय देवगणच्या प्रेमात होतो. अजय आणि तब्बुनं विजयपथ, हकीकत, दृश्यम, गोलमाल अगेन, दे दे प्यार दे सारखे चित्रपट केले आहेत.
तब्बु आणि अजय हे आता दृश्यम 2 मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या खास गप्पांनिमित्त तब्बुनं काही धक्कादायक खुलासे केले. त्यामध्ये तिनं आपण आजही अजयमुळेच सिंगल राहिल्याचे सांगितले. माझ्यासोबत कुणी मुलगा दिसल्यास त्याला मारण्याची धमकी अजयनं दिली होती. तो त्यावेळी फार गुंडगिरी करत असे. त्यामुळे मला सिंगलच राहावं लागलं. असं तब्बुनं सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.