Ayodhya Mahant raju das says boycott shahrukh khan and deepika padukone film pathaan Google
मनोरंजन

Pathaan: 'ज्या थिएटरात शाहरुखचा 'पठाण' लागेल तिथे..', अयोध्येचे महंत राजू दास भडकले

'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं रिलीज झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

प्रणाली मोरे

Pathaan: शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'पठाण' चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'पठाण' चित्रपटा मधील 'बेशरम रंग' गाणे प्रदर्शित झाले अन् लगोलग त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. दीपिकानं भगव्या रंगाची बिकीनी परिधान करुन हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचे काही हिंदू संघटनांनी म्हटले आहे. अयोध्याचे महंत राजू दास यांनी 'पठाण' या चित्रपटावर बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे.(Ayodhya Mahant raju das says boycott shahrukh khan and deepika padukone film pathaan)

अयोध्याचे महंत राजू दास म्हणतात की,"बॉलीवूड आणि हॉलीवूड हे नेहमी सनातन धर्माला बदनाम करण्याचाही प्रयत्न करतात, इतकेच नव्हे तर हिंदू देव देवतांचा देखील अपमान करतात आणि खिल्ली उडवतात, दीपिका पदुकोणने केसरी रंगाची बिकिनी घालून साधु संताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे".

शाहरूख खान हा नेहमीच सनातन धर्माची मस्करी करतो, अजुन दुसऱ्या रंगाची बिकनी का नाही ? केसरी रंगाची का? हा सर्व अश्लील बाजार कशाला पाहिजे, या विरूद्ध कारवाई झाली पाहिजे..अन्यथा ज्या थिएटरात चित्रपट लागेल त्याची राख करू. या चित्रपटाचा मी बहिष्कार करतो आणि चित्रपट गृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही''.

शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'पठाण' चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. दीपिकानं भगव्या रंगाची बिकिनी परिधान करुन हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचे काही हिंदू संघटनांनी म्हटले होते. त्यात या चित्रपटानं धार्मिक भावना भडकावल्याचा आरोपही सोशल मीडियावरुन केला जात आहे. नवीन वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT