मुंबई - बॉलीवूडचा भाईजान असणा-या सलमानच्या येणा-या प्रत्येक चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असते. ईदला त्याचे सिनेमे प्रदर्शित होत असतात. गेल्या वर्षी असणारे कोरोनाचे सावट यामुळे त्याचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला. लॉकडाऊनमुळे कित्येक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. निर्माता आणि दिग्दर्शक यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चालु वर्षी परिस्थितीमध्ये थोडा फरक पडला असल्याने आता परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे.
सलमानचे मागील चार ते पाच वर्षांपासूनचे चित्रपट पाहिल्यास त्याचे प्रदर्शन त्याने ईदच्यावेळेस केले आहे. त्यात वाँटेट, दबंग भाग 1 आणि 2, टायगर जिंदा है, भारत, या चित्रपटांची नावे सांगता येतील. आताही त्याचा एक नवा चित्रपट ईदच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख सलमाननं सोशल मीडियावरुन जाहीर केली आहे. हा चित्रपट भारतात ईदला प्रदर्शित होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही ओटीटी कंपन्यांनी सलमानशी संपर्क साधून तो आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा असा प्रस्ताव सलमानसमोर ठेवला होता. मात्र त्याने तो प्रस्ताव नाकारल्याचे कळते आहे. त्यामुळे येत्या दिवाळीच्या काळात थिएटरमध्येच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ असे सलमानच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी त्याला 250 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. मात्र सलमाननं ओटीटीला नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, असा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे देशातील अनेक सिनेमागृहे बंदच आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत ते पहिल्यासारखे सुरु होतील असे चित्र दिसत नाही. त्यामुळे अनेक मोठ्या चित्रपटांनी सिनेमागृहांची वाट पाहण्याऐवजी OTT पर्याय निवडला आहे. त्यामुळे सलमानचा चित्रपट मात्र कुठल्याही परिस्थितीत सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित होणार आहे. त्याने एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सलमान म्हणाला, थिएटरचे मालक आणि एक्सहिबिटर्स सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी राधे हा चित्रपट मी थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात त्यांनी माझ्या चाहत्यांना चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षितता द्यावी ही विनंती. इंशाअल्लाह 2021 मध्ये ईदच्या मुहुर्तावरच चित्रपट प्रदर्शित होईल.” हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. क्षमा असावी. कारण सिनेमागृहांच्या मालकांसोबत चर्चा सुरु असल्यामुळे मला उत्तर द्यायला थोडा उशीर झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.