शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाची त्याचे चाहते आतूरतेने वाट पहात होते. मात्र पठाण चित्रपट शाहरुखला काही पचणी न पडल्याचं चित्र आहे. त्याच्या चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यावरून देशभरात वादाला तोंड फुटलं आहे. बेशरम रंग हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं असून या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे या चित्रपटाला बॉयकॉट करण्यात यावं अशी मागणी होत आहे. या वादावर खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .
या मुद्द्यावर एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, महाराष्ट्रातील अमरावती येथील लोकसभा खासदार नवनीत राणा यांनी शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाशी संबंधित वादांवर उघडपणे आपली प्रतिक्रिया दिली. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीच्या वादावर त्या म्हणाल्या, गाण्यात असे आक्षेपार्ह आणि दुखावणारे दृश्य असेल तर ते एडिट करून पुन्हा प्रदर्शित करावे.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, 'चित्रपटात चुकीच्या पद्धतीने रंग वापरण्यात आला असून त्यामुळे देशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, तर सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट आधी पाहावा, असं मला वाटतं. या प्रकरणात तथ्य आढळल्यास, अशी आक्षेपार्ह आणि दुखावणारी दृश्ये एडिट करून पुन्हा प्रदर्शित करावीत.
नवनीत राणा पुढे म्हणाले, 'कोणत्याही सिनेमावर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर बहिष्कार टाकण्याऐवजी दुसरा मार्ग स्वीकारण्याचा विचार केला पाहिजे. इथे भावना दुखावल्या गेल्या असतील तर बहिष्कार टाकण्याऐवजी सेन्सॉरशिप हाच योग्य मार्ग आहे कारण त्यामुळे चित्रपटसृष्टीचे मोठे आर्थिक नुकसान होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही या उद्योगाचा आधार मिळतो. असंही त्या म्हणाल्या.
शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार 'पठाण'चे बजेट 250 कोटी रुपये आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाशिवाय जॉन अब्राहम देखील दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.