Deepika Padukone: जेव्हा पासून 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' गाणं रिलीज झाले आहे तेव्हापासून त्या गाण्यात दीपिकाने घातलेल्या केसरी रंगाच्या बिकिनीवरनं वाद पेटला आहे. पण तंस पाहिलं तर याआधीपण दीपिका पदुकोणच्या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही सीनवरनं वाद झाले आहेत, इतकंच काय तर तिच्या चित्रपटांवर बहिष्कार देखील घालण्यात आला होता.पण इतके सगळे होऊन सुद्धा दीपिका पदुकोणच्या त्या वादग्रस्त चित्रपटांनीच बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला होता.(Deepika Padukone Movie Controversy,Pathaan,Bajirao Mastani,Padmaavat boxoffice record)
पठाण चित्रपटातील ' बेशरम रंग' गाण्यातील दीपिका पदुकोणच्या केसरी रंगाच्या बिकिनीने हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे हिंदू संघटनातील लोक म्हणत आहे.या गाण्यावर आणि चित्रपटावर बहिष्कार घालण्यात येत आहे. हे असं दीपिका पदुकोणच्या बाबतीत पहिल्यांदा होत नाही आहे. असे दीपिका पदुकोणचे काही चित्रपट आहेत जे कपड्यावरून वादात पडले तरी चित्रपटाने चांगलीच कमाई केली.
पद्मावती
२०१८ मध्ये पद्मावत चित्रपटाला घेऊन देखील मोठी चर्चा झाली होती. ' घुमर घुमर गाण्यांमध्ये दीपिकाची कंबर दाखवण्यात आली होती या वरून करणी सेनेने विरोध केला होता. राणी पद्मावती नेहमी साडीमध्ये असत आणि त्यांनी आ पले अंग प्रदर्शन कधी केले नाही. त्यानंतर इफेक्ट्सने दीपिका पदुकोणची कंबर लपवली. तरीही या चित्रपटाने ५८५ करोडोंची कमाई केली.
बाजीराव मस्तानी
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाला घेऊन खुप वाद झाला होता. या चित्रपटामध्ये जे काही पेशवाई आणि त्यांच्या दोन्ही राण्यांबदल चुकीचं दाखविण्यात आले आहे ते सगळे खरे नव्हते असा आरोप केला गेला. नंतर चित्रपटात काही बदल करण्यात आले. चित्रपटाचं बजेट १४५ करोड होते तर बॉक्स ऑफिसवर ३५६ करोड कमाई केली.
गोलियों की रासलीला
या चित्रपटाच्या नावाने खुप हंगामा केला होता. राम-लीला या नावाने श्री रामाच्या नावाची अवहेलना होत आहे. त्यामुळे राम-लीला समितीने केस केली होती. या चित्रपटात सेक्स,हिंसा आणि अश्लीलता दाखवण्यात आली आहे त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत असे तक्रारीत म्हटले गेले होते. त्यानंतर चित्रपटाचे नाव 'गोलियों की रासलीला- राम-लीला' असे केले.. ८८ करोड मध्ये बनलेल्या चित्रपटाने २०१ करोड ची कमाई केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.