mahesh manjarekar 
मनोरंजन

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना धमकी देऊन ३५ कोटींची खंडणी मागणा-याला अटक

अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या अनेक खळबळजनक गोष्टी घडताना दिसत आहेत. बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डचं नातं अनेकदा सिनेमातून उलगडण्यात आलं आहे. मात्र असंच काहीसं आता घडलंय ते अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या बाबतीत. महेश मांजरेकर मराठी सिनेसृष्टीसोबतंच बॉलीवूडमध्येही तितकेच सक्रिय आहेत. सलमान खान आणि त्यांचं नातं देखील फार जवळंच असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या हत्येचा कट रचणा-या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती आणि आता सलमान खान खान नंतर त्याची चांगली आणि जवळची मैत्री असलेल्या महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्ड कडून धमकी देण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. 

अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचं कळतंय. अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमच्या नावाने महेश मांजरेकर यांना खंडणीची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. खंडणी स्वरुपात त्यांच्याकडून तब्बल ३५ कोटींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याचंही कळतंय.    

अबु सालेमचे व्हीडीओ पाहून रचला कट

अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने मांजरेकर यांच्याकडे तब्बल 35 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी आरोपीला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये चहाची टपरी बंद झाल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे.

दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या टोळीतील एक व्यक्ती असल्याचे सांगत खंडणीसाठी संदेश पाठवला होता. त्याने 35 कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपीची मागणी केली होती. याप्रकरणी दादर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी समांतर तपास करून तात्काळ त्याला गुरूवारी सकाळी अटक केली.

मिलींद बाळकृष्ण तुळसणकर असे अटक आरोपीचे नाव असून त्याची धारावी येथे चहाची टपरी होती. लॉकडाऊनमध्ये त्याचा चहाचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे कमाईचे कोणतेही साधन त्याच्याकडे नव्हते. लॉकडाऊनमध्ये धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे अखेर तुळसणकरने कोकणातील खेड हे गाव गाठले. पण तेथेही त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. तुळसणकरला अंडरवर्ल्डबाबत माहिती घेणे आवडायचे. त्यामुळे तो गँगस्टर अबु सालेमचे व्हिडीओ पहायचा. त्यातून त्याने पैसे कमवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला.

मांजरेकर यांना सर्वप्रथम 23 ऑगस्टला त्याने दूरध्वनी केला होता. पण त्यांनी तो न उचलल्यामुळे 23 ऑगस्टला त्याने धमकीचे दोन संदेश महेश मांजरेकर यांना पाठवले. त्यांनी ते वाचल्यांतर तात्काळ याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. पण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय सावंत, पोलिस निरीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात केली. त्यावेळी संदेश पाठवणारा व्यक्ती खेड येथून संदेश पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तुळसणकरपर्यंत पोलिस पोहोचली. त्याला चौकशीसाठी गुरूवारी सकाळी मुंबईत आणण्यात आले.

खंडणी विरोधीत पथकाच्या कक्षात करण्यात आलेल्या चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला गुरूवारी सकाळी अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सध्यातरी आरोपीचा अबु सालेम अथवा अंडरवर्ल्डशी कोणताही संबंध असल्याचे निष्पन्न झालेले नाही. तरी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत  आहेत.

''त्या व्यक्तीचा मला संदेश आला आणि त्याने पैशाची मागणी केली. त्यामुळे मी त्या व्यक्तीविरुद्ध रीतसर पोलिसांत तक्रार नोंदविली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला अटकदेखील केली आहे. मुंबई पोलिसांनी आपली कामगिरी चोख केली आहे. मी सध्या पोलिस संरक्षण वगैरे घेतलेले नाही.''

- निर्माते-दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर

मांजरेकर यांनी निवडणूक लढवल्याने मिळाला क्रमांक

मांजरेकर यांनी निवडणूक लढवली असल्यामुळे माय नेता डॉट कॉमवर आरोपी तुळसणकरला त्यांचा क्रमांक तेथे सापडला. त्याच्या सहाय्याने तो क्रमांक मिळवल्यानंतर त्याने खंडणीचे संदेश मांजरेकर यांना पाठवले. संदेशात आरोपीने पैशांची मागणी हवाला मार्फत केली होती. त्यासाठी त्याने अब्दुल रशीद नावाच्या हवाला ऑपरेटरकडे पैसे देण्यास सांगितले होते. तो खंडणीच्या रकमेवर 15 टक्के जास्त घेईल, असेही संदेशात स्पष्ट केले होते.

संकलन- दिपाली राणे-म्हात्रे

bollywood director mahesh manjrekar threatened from underworld  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

SCROLL FOR NEXT