Ganapath Twitter Review Esakal
मनोरंजन

Ganpath Twitter Review: गणपत'मधून टायगर फॉर्ममध्ये आला की फ्लॉप झाला, नेटकऱ्यांची काय मतं...

टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनची जोडी 'गणपत' या भ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतली आहे. आता लोकांना हा चित्रपट कसा वाटला हे जाणुन घेवुया...

Vaishali Patil

Ganapath Twitter Review: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन स्टारर 'गणपत' हा चित्रपट आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. क्रिती आणि टायगर दोघांचे चाहते या सिनेमाची आतुरतेने प्रतिक्षा करीत होते. चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर रिलिज झाल्यानंतर या अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती.

आता 'गणपत' सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांची गर्दी होत आहे. नेटकऱ्यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर चित्रपट कसा वाटला याबाबत मायक्रोब्लॉगिंग साइट X वर रिव्ह्यू शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आता लोकांना टायगरचा 'गणपत' आवडला की नाही? यावर नजर टाकूया.

अ‍ॅक्शनने भरलेल्या 'गणपत' या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी या सिनेमाचा पहिला शो पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मिडीयावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

अनेकांना गणपत हा चित्रपट खुप आवडला आहे तर काहींनी या चित्रपटाला निराशाजनक म्हटलं आहे. काहींनी या चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे कौतुक केले आहे तर काहींनी या चित्रपटात वेगळं काहीच नसल्याचं म्हटलं आहे.

रमेश बाला यांनी गणपत पाहिल्यानंतर आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'गणपत हा एक भविष्यकालीन अ‍ॅक्शन थ्रिलर आणि मनोरंजक चित्रपट आहे. टायगर श्रॉफने चाहत्यांना दिलेली ही एक ट्रीट आहे. टायगर श्रॉफच्या कारकिर्दीतील सर्वात प्रगत अ‍ॅक्शन चित्रपट..त्याची स्टाइल स्वॅग आणि अ‍ॅक्शन कमाल!'

एकाने लिहिले आहे की, 'गणपतने बॉलिवूडला जोमाने भविष्यवादी जगात ढकलले आहे. टायगर श्रॉफ जे करतो ते सर्वोत्तम करतो तर कृती सेनेन पुन्हा दाखवले की एक अभिनेत्री हिरो-केंद्रित स्टोरीत कशी चमकते. दिग्दर्शक विकास बहल यांचे कथनक थोडे गडबडले आहे.'

सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या सतत प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी म्हटलं की 'चित्रपटाची कथा बकवास आहे.'

एका यूजरने लिहिले की, 'गणपत हा वेळेचा अपव्यय आहे.' तर दुसऱ्याने लिहिलं की, 'चित्रपट अवघ्या 10 मिनिटात बोर (कंटाळवाणा) करतो आहे'. तर एकानं लिहिले की, 'चित्रपटात फक्त अ‍ॅक्शन आहे, कथा नाही. चित्रपटात पाहण्यासारखं काहीचं नाही.'

गणपतची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. हा चित्रपट आता हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये थिएटरमध्ये रिलिज करण्यात आला आहे. ज्यात टायगरशिवाय अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनन देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT