Haddi movie Esakal
मनोरंजन

Haddi movie: 'हड्डी' चित्रपटात झळकणार पहिली ट्रान्सजेण्डर मराठी अभिनेत्री...

सकाळ डिजिटल टीम

नवाझुद्दीन सिद्दिकीचा आगामी सिनेमा 'ह्ड्डी' सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दिकीने आतापर्यंत केलेल्या त्याच्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आणि इंट्रेस्टिंग भूमिका साकारली आहे. या सिनेमात त्यानं एका ट्रान्सजेंडर महिलेची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचा नवा लूकमध्यही खूप व्हायरल झालाय.

त्यात त्यानं ग्रीन रंगाची साडी, माथ्यावर लाल रंगाची बिंदी, डार्क शेडची लिपस्टिक,लांब मोकळ्या केसात नवाझुद्दीन कमाल दिसतोय. त्याच्यासोबत तब्बल ८० ट्रान्सजेंडर्ससोबत काम केलं आहे. मात्र त्याच्यासोबत आणखी एक ओळखीचा चेहरा दिसतोय.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये नवाजुद्दीनच्या शेजारी दिसणारी कलाकार मराठी चित्रपटसृष्टीतील पहिली ट्रान्सजेण्डर अभिनेत्री गंगा आहे. गंगाने मराठी इण्डस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती यापूर्वी मराठी मालिकांमध्येही दिसली आहे. कारभारी लयभारी' या मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती.

तिने झी युवा वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले होते. आपल्या मेहतीने आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यास गंगा यशस्वी झाली. आणि आता ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती नवाजुद्दीनसोबत 'हड्डी' चित्रपटात झळकणार आहे. गंगा तिच्या अभिनयासोबतच तिच्या प्रेमळ स्वभावासाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळेच तिला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

अक्षत अजय शर्मानं दिग्दर्शित हड्डी' सिनेमा हा सिनेमा एका बदल्यावर आधारित आहे सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. आता पहायचं नवाझुद्दीन आपल्या 'हड्डी' सिनेमासोबत बॉक्स ऑफिसवर किती मोठा धमाका करतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ! शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन आठवले पक्षातून हकालपट्टी

IND vs BAN: धावा नाही केल्या तरी काय झालं? Virat Kohli च्या नागीन डान्सवर चाहते खूश, पाहा व्हिडिओ

Bigg Boss Marathi 5: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

SCROLL FOR NEXT