Kadar Khan Death anniversary, switched to comedy after incident with son Google
मनोरंजन

Kadar Khan: 'त्या' घटनेनंतर कादर खान यांनी पुन्हा कधी सिनेमातून खलनायकी भूमिका साकारलीच नाही...

कादर खान यांनी ९० च्या दशकात कॉमेडी भूमिका करायला सुरुवात केली..पण ७० आणि ८० चा दशक त्यांच्या खलनायकी भूमिकांनी गाजला होता.

प्रणाली मोरे

Kadar Khan Death Anniversary: 90 च्या दशकातील सिनेमांचा काळ ज्यांनी-ज्यांनी अनुभवलाय त्या सर्वांनाच कादर खान चांगलेच लक्षात असतील. 'दूल्हे राजा','बोल राधा बोल' आणि 'हिरो नंबर 1' सारख्या सिनेमातून गोविंदासोबत कादर खान यांची चांगलीच जुगबंदी रंगलेली आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. ९० च्या हिंदी सिनेमात ती एक वेगळीच गम्मत होती. पण कॉमेडी भूमिकांसाठी जास्त सगळ्यांच्या स्मरणात राहिलेले कादर खान ७० आणि ८० च्या दशकात स्क्रीनवर कपटी खलनायक म्हणूनही पॉप्युलर होते.(Kadar Khan Death anniversary, switched to comedy after incident with son)

अमिताभ बच्चनच्या अल्टीमेट हिट 'कुली' सिनेमात कादर खान यांनी जफर खान ही खलनायकी व्यक्तिरेखा रंगवली होती. 'डर' सिनेमात शाहरुख खानची जी सनकी राहूल मेहराची भूमिका आहे अगदी त्याच धाटणीची भूमिका कादर खाननी रंगवलेल्या जफर ची होती.

'अंगार' सिनेमात कादर खाननी मुंबईच्या डॉनची म्हणजे जहांगीर खानची व्यक्तिरेखा साकारली होती. असं म्हणतात..यातील कादर खानच्या भूमिकेचा म्हणे पुढे अनेक खलनायक रंगवणाऱ्या कलाकारांनी अभ्यास केला. 'दो और दो पांच' आणि 'खून का कर्ज' या सिनेमात कादर खान यांनी रंगवलेल्या खलनायकी भूमिकेमुळे त्यावेळी त्यांना अनेक लोकांनी प्रत्यक्ष आयुष्यातही शिव्या शाप दिले होते.

पण तिथेच कहाणीत ट्वीस्ट आला आणि आपल्या दमदार आवाजानं प्रत्येक खलनायकी भूमिकेत जान घालणाऱ्या कादर खाननी अचानक कॉमेडीकडे आपली वाट वळवली. असं का झालं...तर याचं कारण त्यांच्या मुलाशी जोडलेलं आहे..जे एकदा त्यांनी स्वतःच खुलासा करत सांगितलं होतं.

एका जुन्या मुलाखतीत कादर खान यांनी सांगितलं होतं की, आपला मुलगा अब्दुल कद्दुसमुळे त्यांनी बॉलीवूडमध्ये खलनायकी भूमिकांपासून दूरावा साधला.ते म्हणाले,''माझा मोठा मुलगा कुद्दुस जेव्हा आपल्या मित्रांशी खेळून परत यायचा,तेव्हा अनेकदा त्याचे कपडे फाटलेले असायचे. तो एक खलनायक म्हणून खेळाच्या शेवटी मार खाऊन यायचा. त्याचे मित्र त्याला म्हणायचे,तुझे वडील आधी लोकांना मारतात आणि स्वतः शेवटी मार खातात,तुलाही खावा लागेल''.

''माझ्यामुळे माझ्या मुलाला खूप मार खावा लागला आहे,अडचणींचा सामना त्याला करावा लागला आहे. मला त्याचे मित्र खूप काही बोलायचे,ते ऐकून माझ्या मुलाला राग यायचा आणि मग तो माझ्यावरच त्याचा राग काढायचा.एकदा तो घरी परत आला तेव्हा त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता.आणि तो खूप अस्वस्थ होता. तेव्हा मी ठरवलं..यापुढे मी खलनायक साकारणार नाही. तेव्हाच 'हिम्मतवाला' सिनेमा बनत होता. आणि मग तिथूनच मी माझ्या कॉमेडी सिनेमाचा प्रवास सुरु केला''.

एक उत्तम अभिनेता,दर्जेदार लेखक आणि सर्वपरिचित असं व्यक्तिमत्त्व असलेले कादर खान यांचं निधन ३१ डिसेंबर, २०१८ रोजी झालं होतं. निधनाच्या काही वर्ष आधी त्यांना सुपरान्युक्लियर पाल्सी या आजारानं ग्रासलं होतं. आणि त्यातच त्यांची प्रकृती बिघडत गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT