Bollywood Movies: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगचा 83 प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. नेटकऱ्यांनी रणवीर आणि (83 Movie) दीपिकावर कौतूकाचा वर्षाव केला होता. यासगळ्यात क्रिकेट (Ranveer Singh) जगतातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील रणवीरच्या अभिनयाला दाद दिली होती. या चित्रपटामध्ये त्यानं भारताचे माजी कर्णधार आणि वर्ल्ड कप विजेत्या संघाचे शिल्पकार कपिल देव (Kapil Deo) यांची भूमिका साकारली होती. 1983 मध्ये भारतानं दैदिप्यमान कामगिरी केली होती. त्यामुळे पूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला गेला. 83 चित्रपट जेव्हा जगभर प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्याविषयीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. आणि त्याची चर्चाही झाली.
आता क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय गोलंदाज रिचर्ड हॅडली यांनी 83 पाहिल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यासाठी त्यांनी कपिलचं कौतूक करणार एक पत्रही लिहिलं आहे. आपण जेव्हा 83 पाहिला तेव्हा भावूक झालो असं त्यांनी म्हटलं आहे. कपिलच्या संघाचं कौतूक करत ज्या संघभावनेनं, कमालीच्या संघर्षानं त्यांनी विश्वकरंडक जिंकला त्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 83 आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. न्युझीलंडच्या महान गोलंदाज रिचर्ड हॅडलीनं दिलेल्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी देखील त्यांना वेगवेगळ्या कमेंटस् दिल्या आहेत.
हॅडली यांनी कपिलच्या नावानं पत्र लिहिलंय. आणि ते सोशल मीडियावर शेयरही केलं आहे. कपिलजी आपण त्यावेळी कमाल केली होती. आपली शतकी खेळी प्रेरणा देणारी होती. भलेही ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली नसेल. मात्र ज्यांनी ती पाहिली त्यांच्या हदयात अजूनही ती कायम आहे. 83 पाहिल्यावर मी भावूक झालो आहे. या चित्रपटानं मला त्या वेगळ्या काळात नेलं जो आपण जगलो आहोत. झिम्बाबेच्या विरोधात तुम्ही केलेली खेळी, टीमला फायनल पर्यत घेऊन जाण्याची दाखवलेली कमाल हे सारं थक्क करणारं होतं. अशा शब्दांत हेडली यांनी कपिल यांचं कौतूक केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.