bajirao mastani 
मनोरंजन

'बाजीरावच्या' भूमिकेत नको रणवीर, भन्साळींची इच्छा होती की...

बॉलीवूडमध्ये (bollywood movies) बाजीराव मस्तानी (bajirao mastani) या चित्रपटानं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली होती.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये (bollywood movies) बाजीराव मस्तानी (bajirao mastani) या चित्रपटानं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली होती. संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) दिग्दर्शित या चित्रपटामध्ये बाजीरावच्या भूमिकेत रणवीर सिंग आणि मस्तानीच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका पदूकोणनं (actress deepika padukone) केलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका मुलाखतीमध्ये भन्साळी यांनी सांगितलं होतं की, बाजीरावसाठी आपली पहिली पसंद ही रणवीर कधीच नव्हता. आपली आवड आणि पसंती दुसऱ्याच एका अभिनेत्याल होती. मात्र त्यानं दिलेला नकार याचा परिणाम रणवीर सिंगसाठी फायद्याचा ठरला आणि या चित्रपटानं इतिहास घडवल्याचे दिसून आले.

भन्साळी यांनी सांगितलं की, आपण जेव्हा बाजीराव मस्तानीची ऑडिशन घेण्यास सुरुवात केली तेव्हा अनेक अभिनेत्यांनी आपल्याला हा रोल मिळावा अशी मागणी केली होती. मात्र तो रोल रणवीरच्याच नशीबात होता. मी त्याच्याऐवजी अजय देवगणला (ajay devgn) पाहत होतो. मात्र त्याला त्यावेळी त्याच्या आणखी दुसऱ्या चित्रपटाचे शुटिंग असल्यानं बाजीराव मस्तानीमध्ये तो काही दिसलाच नाही. शेवटी रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंही त्याच्या परफॉर्मन्सनं साऱ्यांना वेड लावले होते.

रणवीरसोबत दीपिकाचीही भूमिका महत्वाची होती. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. केवळ भारतातच नाही तर जगातही बाजीराव मस्तानीनं तुफान कमाई केली होती. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, अजय़च्या दुसऱ्या चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. त्याचे दिग्दर्शन तो स्वत करत होता. रणवीर आणि दीपिकासोबत या चित्रपटामध्ये प्रियंकाही दिसली होती. तिच्याही भूमिकेचं कौतूक झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT