Bollywood Movies: भारतीय चित्रपटसृष्टीत मानाच्या सर्वोत्कृष्ठ चित्रपटांमध्ये ज्या चित्रपटांचा समावेश होतो त्यात लगानचे नाव येते. (Lagaan movie) बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं यात प्रमुख भूमिका साकारली होती. तर त्याची सह अभिनेत्री होती ग्रेसी सिंग. (Aamir Khan) आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. केवळ भारतातच नाहीतर जगातील अनेक देशांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून गौरविण्यात आले होते. नुकतीच या चित्रपटानं त्याच्या निर्मितीची 21 वर्षे पूर्ण केली आहेत.
आमिरने 'लगान: वन्स अपॉन ए टाइम'ची २१ वर्षे त्याच्या घरी मरिना (Bollywood Actors) येथे साजरी केली. या सोहळ्यासाठी चित्रपटातील नामवंत कलाकारही त्यांच्या घरी उपस्थित होते. 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झालेला लगान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. ऑस्कर आणि अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या तीन भारतीय चित्रपटांपैकी हा एक होता.
आमिर खानच्या प्रॉडक्शनने 'लगान' टीमच्या इंटिमेट सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील 'चले चलो' हे गाणे वाजत असून संपूर्ण टीम एकत्र मस्ती करताना दिसली. लगान हा 1893 मधील भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या व्हिक्टोरियन काळातील कथेवर आधारित होता. आमिर खान प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे.
आमिर खान आणि संपूर्ण टीमसाठी 'लगान'ला भावनिक महत्त्व आहे. 2021 मध्ये महामारीच्या काळात, चित्रपटाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्टारने वर्चुअल गैदरिंग केले होते. पण यावेळी दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्ट या एव्हरग्रीन चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले. आशुतोष गोवारीकरपासून ते अखिलेंद्र मिश्रा, ग्रेसी सिंग, यशपाल शर्मा, रघुवीर यादव, राजेश विवेक उपाध्याय, दया शंकर पांडे, राजेंद्रनाथ झुत्शी, राजा अवस्थी, सुहासिनी मुळे, प्रदीप रामसिंग रावत, अमीन गाझी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. यूकेच्या अनेक आघाडीच्या निर्मात्यांनी आमिर खान प्रॉडक्शनला चित्रपटाच्या हक्कांसाठी विनंती केली आहे आणि वेस्ट एंड थिएटरबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.