Nysa Devgan trolled,viral video from christmas party. Google
मनोरंजन

Nysa Devgan: ख्रिसमस पार्टीला गेलेली नीसा देवगण ट्रोल,व्हिडीओ पाहून लोक म्हणतायत, 'हिनं नक्कीच पार्टीत..'

ख्रिसमस पार्टीला गेलेल्या नीसा देवगणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Nysa Devgan: अजय देवगण आणि काजोलची मुलगी नीसा देवगण बॉलीवूड सिनेमांपासून लांब असली तरी स्टार किड म्हणून तिची नेहमीच चर्चा रंगलेली दिसते. आता ती केवळ १९ वर्षांची आहे. परदेशात तिनं शिक्षण घेतलं आहे पण सध्या ती मुबंईत बऱ्याचदा फिरताना नजरेस पडते. नुकतीच ती आपले मित्र ऑरी, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अर्जुन रामपालची मुलगी माहिका रामपाल सोबत ख्रिसमस पार्टी सेलिब्रेशनसाठी पोहोचली होती. (Nysa Devgan trolled,viral video from christmas party).

तेव्हा पार्टीतून बाहेर आल्यानंतरचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट करताना नजरेस पडत आहेत. कोणी म्हणताना दिसत आहेत की तिनं नक्कीच ड्रिंक(मद्यप्राशन) केलंय आणि ती नशेत आहे. तर कुणी म्हणतंय,'एवढी ओव्हर अॅक्टिंग करण्याची गरज आहे का?' तर अनेक जण तिच्या गोऱ्या रंगावर आणि प्लास्टिक सर्जरीविषयी चर्चा करताना दिसत आहेत.

नीसा देवगण ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी इब्राहिम अली खान, ऑरी आणि माहिका रामपाल सोबत मुंबईत एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. तिनं गुलाबी रंगाचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान केला हातो. नीसा जेव्हा पार्टी करुन बाहेर आली तेव्हा तिला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी पापाराझीनं एकच गर्दी केली. सुरुवातीला तर कॅमेरा पाहून नीसा घाबरली,पण नंतर तिनं असा काय अॅटिट्युड दाखवला की नेटकरी तिचा व्हिडीओ पाहून तिला ओव्हर अॅक्टिंग केल्यामुळे ट्रोल करू लागले.

नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की नीसा काही काळ आधीपर्यंत खूप वेगळी दिसायची. तिचा रंग आधी सावळा होता. पण गेल्या काही वर्षात नीसाचा रंग एकदम बदलला आहे. ती गोरी दिसत आहे. काही लोक तर हे देखील म्हणताना दिसत आहेत की तिनं सर्जरी केली आहे.

नीसाचा जन्म २० एप्रिल २००३ मध्ये मुंबईत झाला होता. ती सिंगापूरमध्ये शिक्षणासाठी गेली होती. माहितीनुसार,२०१९ मध्ये नीसाला लोकांनी खूप वाईट पद्धतीनं ट्रोल केलं होतं,जेव्हा ती आपले आजोबा वीरू देवगण यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी सलौन मध्ये गेली होती. त्यानंतर अजय देवगणनं स्पष्टिकरण देत म्हटलं होतं की,त्याची मुलगी नीसा आजोबांच्या निधनानंतर खूप अपसेट झाली होती म्हणून त्यानेच तिचा मूड ठीक व्हावा म्हणून बाहेर पाठवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT