Karan Johar  
मनोरंजन

चक्क करण जोहरनं दिले मतदान अधिकाराचे धडे

बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं प्रेक्षकांना आपलसं करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये करण जोहरच्या (Karan Johar) नावाचा उल्लेख करावा लागेल.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं प्रेक्षकांना आपलसं करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये करण जोहरच्या (Karan Johar) नावाचा उल्लेख करावा लागेल. आज राष्ट्रीय मतदान अधिकार दिन (National Voters Day) आहे. त्यानिमित्तानं त्यानं एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यानं मतदान अधिकाराबाबत प्रत्येकानं जाणीवपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सध्या करण जोहरची ती पोस्ट व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये करणनं चाहत्यांना मतदान अधिकाराबाबत अधिक जागृत होण्यासाठी आवाहनही केले आहे. Bollywood producer director karan johar share post

24 जानेवारी, 2022: 'राष्ट्रीय मतदार दिवसा'च्या आधी प्रख्यात सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने (Karan) सामान्य नागरिकांमध्ये मतदान अधिकारांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी खास पाऊल उचलले आहे. भारताचा एकमेव बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू अँप' वर करणने एक पोस्ट लिहिली आहे. भारतात 25 जानेवारी हा 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. यासंदर्भाने करणने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू अँप वर पोस्ट केले, "भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि मतदान हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे. आज 25 जानेवारी 'राष्ट्रीय मतदाता दिवस' आहे आणि यानिमित्त मला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे, की मत देण्याचा आपला अधिकार वापरण्यास विसरू नका."

करण जोहर अनेक सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर वेळोवेळी निर्भिडपणे व्यक्त होत असतो. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरसह पाच राज्यांमध्ये येत्या 10 फेब्रुवारीपासून 7 मार्चच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल 10 मार्चला घोषित केले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT