Bollywood actress Kangana Ranaut 
मनोरंजन

कंगनाची 'डिमांड' योगी आदित्यनाथ यांचा 'ग्रीन सिग्नल'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये कंगना रनौत (Bollywood actress Kangana Ranaut) ही मोठी सेलिब्रेटी (bollywood celebrity) आहे. तिच्या नावावर दोनपेक्षा अधिक राष्ट्रीय पुरस्कारांची (National Awards) नोंद आहे. ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. महिन्यापूर्वी तिनं देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावरुन (Social media) टीका झाली होती. आता कंगना चर्चेत आली आहे ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्यामुळे. त्यांनी कंगनानं जी इच्छा व्यक्त केली होती ती पूर्ण केली आहे. कंगनानं सोशल मीडियावरुन त्याची माहिती दिली आहे.

कंगनानं एक व्हिडिओ शेयर (Video Share) केला आहे त्यामध्ये योगी आदित्यानाथ म्हणतात की, जगातील मोठी फिल्म सिटी (Film City) आपल्याकडे तयार होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. त्यामध्ये जेव्हा कंगनाचे चित्रपट तयार होतील ते तर मी नक्कीच पाहणार आहे. त्यावर कंगनानं योगी आदित्यनाथ यांना प्रतिसाद देताना, महाराज जी असं लिहिलं आहे. कंगनाच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी कंगनानं योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन युपीमध्ये बॉलीवूडच्या धर्तीवर फिल्मसिटी उभारण्याविषयी चर्चा केली होती. तसा प्रस्तावही दिला होता.

कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती पंगा आणि थलाईवीमध्ये दिसली होती. पंगामध्ये केलेल्या तिच्या अभिनयाचे कौतूक झाले होते. थलाईवीमध्येही कंगनानं कमाल केली होती. त्यावरुन कंगना बराच काळ वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली होती. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. आपल्या चित्रपटाचं बॉलीवूडमधल्या खान मंडळीकडून कधीही कौतूक होऊ शकत नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया कंगनानं यावेळी दिली होती. ती आता तिच्या तेजस नावाच्या चित्रपटावरुन चर्चेत आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT