मुंबई - बॉलीवूडमध्ये त्याची इंट्री एक अॅक्शन हिरो (bollywood action hero) म्हणून झाली होती. त्याच्या जोरावर त्यानं वेगळी ओळख निर्माण केली. आज बॉलीवूडमध्ये तो खिलाडी म्हणून प्रसिध्द आहे. त्याचा मोठा चाहतावर्गही आहे. अशा अक्षय कुमारनं सोशल मीडियावर (post share on social media) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातून त्यानं आपण WWF च्या रेसलिंगमधील प्रसिध्द पैलवान अंडरटेकरला हरवण्याचे आव्हान दिले आहे. त्याची ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. चाहत्यांनीही त्याच्या त्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.(bollywood star akshay kumar post viral challange of undertaker fight)
अक्षयच्या (akshay kumar) खतरो के खिलाडीला (khatrao ke khiladi) आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा प्रचंड यशस्वी झाला होता. त्यातून अक्षयची बॉलीवूडमध्ये खिलाडी म्हणून ओळखही झाली होती. आता तो मोठा स्टार झाला आहे. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरही त्यानं चित्रपट तयार केले आहेत. त्यामुळे त्याला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याला पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात देखील अक्षयनं केलेली मदत सर्वांना माहिती आहे. सामाजिकतेचे व्रत जपत त्यानं आतापर्यत वेगवेगळ्या पध्दतीनं लोकांना मदतीचा हात दिला आहे. चाहत्यांनी त्याबद्दल त्याचे कौतूकही केले आहे. कोरोनाच्या महामारीत मनोरंजन क्षेत्राला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत असल्याचे दिसुन आले आहे. अशावेळी त्यानं त्या क्षेत्रातील कर्मचा-यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
सध्या त्याची जी पोस्ट व्हायरल झाली आहे त्यात त्यानं आपल्या खतरो के खिलाडी चित्रपटाला होणा-या 25 वर्षपूर्तीची माहिती दिली आहे. त्यात तो म्हणतो, माझ्या खतरो के खिलाडी चित्रपटाला 25 वर्षे पुर्ण होत आहेत. त्याचा मला विशेष आनंद आहे. यात एक गंमतीची गोष्ट म्हणजे, त्या चित्रपटामध्ये अंडरटेकरची भूमिका ब्रायन ली नावाच्या एका पैलवानानं केली होती. आणि आता मी त्या अंडरटेकरचे आव्हान स्वीकारले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.