बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबद्दल मुंबईच्या कूपर हॉस्पिटलच्या शवागार युनिटच्या एका कर्मचाऱ्याने सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून ती हत्याचं असल्याचा दाव्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे आता या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
कर्मचार्याने धक्कादायक दावा केल्यानतंर 'जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूत' ट्विटरवर ट्रेंड करत आहे. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही शवविच्छेदनाच्या वादावर प्रतिक्रिया देण्यासाठी ट्विटरवर पोस्ट केली आहे.
सुशांतसोबत एक फोटो शेअर करत त्याने लिहिले: "'ते मलाही सोडणार नाहीत...' 'ते' कोण होते, सुशांत, माझा मित्र?" त्यांच्या या ट्विटवर सुशांतसिंह राजपूतचे चाहते कमेंट्स करत सुशांतला न्याय द्यावा अशी मागणी करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी विवेक अग्निहोत्री यांनी सुशांत सिंह राजपूतबद्दल दाखवलेल्या या पुढाकाराचे कौतुक करत आहेत.
स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जाणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटमूळे पुन्हा या प्रकरणाला वेगळं वळण येण्याची शक्यता व्यक्त होतं आहे.
"जेव्हा मी सुशांतच्या शरीराचे निरीक्षण केले तेव्हा सामान्यतः फाशीच्या केसेसमध्ये आढळणाऱ्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्याच्या शरीरावर फ्रॅक्चरच्या खुणा होत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहायचे हे डॉक्टरांचे काम आहे. त्याला न्याय मिळायला हवा. प्रत्येकजण बघूनच सांगू शकेल. सुशांत सिंग राजपूतची हत्या झाल्याचे चित्र आहे. जर तपास यंत्रणा मला बोलावतील, तर मी त्यांनाही सांगेन,".
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
त्यानंतर सुशांतच्या बहीण श्वेता हिने सांगितलं की, "जर या पुराव्यात तथ्य असेलं, तर आम्ही सीबीआयला खरोखरच काळजीपूर्वक तपास करण्याची विनंती करतो. तुम्ही लोक योग्य तपास कराल आणि आम्हाला सत्य कळवा असा आमचा नेहमीच विश्वास आहे. अजून त्याला न्याय मिळाला नसल्याने आम्हाला दुख होत आहे. #justiceforsushantsinghrajput."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.