Bollywood top 10 song who copied form Pakistani  esakal
मनोरंजन

Bollywood Copy Song : चोरटं बॉलीवूड, ती गाजलेली '१०' गाणी पाकिस्तानची चोरलेली!

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Copied Song : बॉलीवूडच्या अनेक गाण्यांवर आपण मोठ्या आनंदानं थिरकतो. त्याचे कौतूक करतो. मात्र अनेकदा ती गाणी दुसऱ्या देशातल्या गाण्यांवर बेतलेली असतात. त्या गाण्यांच्या चाली आपण चोरुन त्याचे नव्या प्रकारे सादरीकरण करुन त्यातून अमाप प्रसिद्धी मिळवली जाते. असे दिसून आले आहे. बॉलीवूडच्या अशा काही लोकप्रिय गाण्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

९० च्या दशकांतील जी लोकप्रिय गाणी होती त्यातील बरीचशी गाणी ही पाकिस्तानी गाण्यांची नक्कल होती. असे दिसून आले आहे. यात प्रामुख्यानं काही गाण्यांचा उल्लेख करायचा झाल्यास, सलमानच्या मुन्नी बदनाम हुई या दबंग चित्रपटातील गाण्याचा उल्लेख करावा लागेल. १९९६ मध्ये पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालेल्या चार्ली नावाच्या चित्रपटातील गाण्याची कॉपी दबंगमधून करण्यात आली होती. ऋतिकच्या वॉर या चित्रपटातील घुंघरु हे गाणं १९६९ साली आलेल्या पाकिस्तानी फिल्म माला चित्रपटातील होते.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

मेरा पिया घर आया (याराना)

हे गाणं नुसरत फतेह अली खान यांच्या मेरा पिया घर आया कव्वालीपासून प्रेरित आहे असे म्हटले जाते. माधुरीचा याराना नावाचा चित्रपट येण्यापूर्वी दोन वर्षांअगोदरच नुसरत यांनी ती कव्वाली गायली होती.

तू चीज बड़ी है मस्त (मोहरा)

हे गाणे देखील नुसरत फतेह अली खान यांच्या एका गाण्याची कॉपी असल्याचे म्हटले जाते. नुसरत यांनी आबिदा परवीन, सब्री ब्रदर्स, रेशमा आणि मदन नूर जेहा यांच्यासोबत गायलेले गाणे होते.

हम भूल गए रे हर बात (सौतन की बेटी)

याशिवाय आता हम भूल गये रे बात १९८९ मध्ये आलेल्या जितेंद्र आणि जया प्रदा, रेखा चित्रपटातील गाण्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ते गाणं लता मंगेशकर यांनी गायले होते. मात्र ते गाणं पाकिस्तानी चित्रपट सहेलीचे होते. तो चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झाला होता.

लंबी जुदाई (जन्नत)

इम्रान हाश्मीच्या २००८ मध्ये आलेल्या जन्नत नावाच्या चित्रपटातील लंबी जुदाई हे गाणं देखील पाकिस्तानी एका गाण्यापासून प्रेरित होते. पाकिस्तानी गायिका रेश्माच्या लंबी जुदाई या गाण्याची ती कॉपी होती. असे म्हटले जाते.

आहूं आहूं (लव आज कल)

सैफ अली खान आणि दीपिका यांचा २००९ मध्ये आलेला लव आज कल हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यातील आहू आहू नावाचे गाणे गाजले होते. मात्र ते गाणे कदी ते हंस बोल नावाच्या पाकिस्तानी गायक शौकत अलीच्या गाण्यापासून प्रेरित होते. असे सांगितले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

SCROLL FOR NEXT