Bose Venkat's tamil actor director sister passes away due to heart attack; His brother dies during funeral  SAKAL
मनोरंजन

Bose Venkat: बहिणीचे अंत्यसंस्कार सुरु असताना भावाचे निधन, लोकप्रिय अभिनेत्यावर कोसळले संकट

Devendra Jadhav

Bose Venkat News: काही दुर्दैवी घटना अशा असतात कि त्या कोणावरही येऊ नये. अशीच एक दुर्दैवी घटना समोर आलीय.

अभिनेता, डबिंग कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे तमिळ चित्रपट कलाकार बोस वेंकट यांच्या आयुष्यात अशीच एक दुर्दैवी घटना घडलीय.

एकाच दिवशी त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांच्या निधनाने दुःखद नुकसान झाले आहे. बोस वेंकट यांचे एकाच दिवशी बहीण आणि भाऊ या दोघांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सहन न होणारा धक्का बसलाय.

(Bose Venkat's sister passes away due to heart attack; His brother dies during funeral)

मीडिया रिपोर्टनुसार, बोस वेंकट यांच्या बहिणीचे चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आणि त्यांचे कुटुंब तिच्या निधनावर शोक करत असतानाच, व्यंकटचा भाऊ रंगनाथन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बहिणीचे अंत्यसंस्कार करताना वेंकट यांचा भाऊ रंगनाथन तिच्या पार्थिवावर कोसळला आणि अखेरचा श्वास घेतला. या दुःखद घटनांनी वेंकट आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे मोडून गेलंय. या प्रचंड दुर्दैवी बातमीने कलाकार आणि नेटकरी शोक व्यक्त करत आहेत.

बहीण आणि भाऊ दोघांचे अंत्यसंस्कार अरथांगी येथे केले जातील असे अहवालातून समोर आले आहे. वेंकट यांचे चित्रपट सहकारी आणि त्यांचे चाहते तीव्र शोक व्यक्त करत आहेत.

एकाच दिवशी कुटुंबातील दोन प्रिय व्यक्ती गमावणे ही एक न भरून येणारी वेदना आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनीही अभिनेत्याच्या भाऊ आणि बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे बदलले मार्ग

IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT