Boycott Laal Singh Chaddha : काही म्हणा पण आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाची अवस्था दयनीय असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून नेटकऱ्यांनी अक्षय कुमार आणि आमिर खानच्या चित्रपटांवर (Aamir Khan Movies) बहिष्काराची भूमिका घेतली आहे. त्याचा फायदा हा टॉलीवूडला होताना दिसतो आहे. दोन्ही सेलिब्रेटींनी आपल्या चाहत्यांना चित्रपट (Akshay Kumar Movies) पाहण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात बॉक्स ऑफिसवर दोन्ही (Bollywood News) चित्रपटांना थंड प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही सेलिब्रेटींच्या चित्रपटांना इतक्या थंडपणे प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी बॉयकॉट बॉलीवूडवर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
आमिर खानच्या बाबत आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात अर्जुन कपूरनं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानं तर जे कुणी आम्हाला सहजपणे घेत आहेत, आमच्या संयमाची परिक्षा पाहत आहेत त्यांना इशारा दिला आहे. यापुढे कुणीही ट्रोल करता कामा नये. जे काही सुरु आहे त्याचा तीव्रपणे आपण निषेध करत असल्याचे अर्जुननं म्हटल्यानंतर त्याच्यावर सडकून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. यासगळ्य़ात टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध निर्माती टीव्ही क्वीन म्हणून जिला ओळखले जाते अशा एकता कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एकतानं आमिरची बाजूनं प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या पाठीशी उभं राहतं आमिर सारख्या कलाकाराला का ट्रोल केले जात आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारलं आहे. भारतीय मनोरंजन विश्वात आणि त्या व्यवसायात त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यानं आतापर्यत बॉलीवूडला मोठ्या प्रमाणात बिझनेस दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलीवूड आणि बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन असा ट्रेंड सुरु झाला आहे. एकतानं त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, मला तर यासगळ्याच गोष्टींचे फार विशेष वाटते. आमिरला का ट्रोल केले जात आहे हे मला कळत नाही. फक्त त्यानेच नाहीतर शाहरुख खान, सलमान खाननं याचं बॉलीवूडसाठी मोठं योगदान आहे.
तुम्ही आमिर खानला बहिष्कार करु शकत नाही. त्यानं त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मी जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यासाठी चाहत्यांची माफी मागतो. त्यांनी माझी ही फिल्म जरुर पाहावी. आता जर काहींनी ती पाहूच नये असे म्हटले असेल तर मी त्यांना काय सांगु, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. असेही आमिरनं म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.