Dimple Kapadiya esakal
मनोरंजन

Dimple Kapadia: 'एवढी मोठी अभिनेत्री अडीच सेकंदच ब्रम्हास्त्रमध्ये दिसली'!

युगंधर ताजणे

Bramhastra movie: ब्रम्हास्त्र आता सुसाट सुटला आहे. ज्या चित्रपटावर बहिष्काराची मागणी होत होती तोच चित्रपट आता प्रचंड कमाई करताना दिसतो (bollywood news) आहे. आलियाच्या हटकेपणाला, रणबीरच्या अनोख्या स्टाईलचं कौतूक होताना दिसतंय. मोठमोठ्या कलाकारांचा या चित्रपटामध्ये भरणा असल्याचे दिसून आले आहे. त्यात बिग बी अमिताभ बच्चन आहेत. टॉलीवूडचा (tollywood superstar) सुपरस्टार नागार्जुन आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखही आहे. मात्र यासगळ्यात चर्चा रंगली आहे ती प्रख्यात अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची. त्यांच्या वाट्याला जेवढी भूमिका आली आहे त्यावरुन चाहते नाराज झाले आहेत.

ज्या अभिनेत्रीनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं कोणे एकेकाळी प्रेक्षकांना वेड केलं होतं त्या डिंपल कपाडिया यांच्या वाट्याला फक्त 2.5 सेकंदाची भूमिका आल्यानं त्यांचे चाहते नाराज झाले आहे. डिंपल यांच्यासारख्या अभिनेत्रीच्याबाबत असं व्हावं हे चाहत्यांना आवडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि आलिया भट्ट यांच्यावर आगपाखड केली आहे. सोशल मीडियावर त्यावरुन काही मीम्सही व्हायरल झाले आहेत. त्यात आलिया - रणबीरची थट्टा उडवण्यात आली आहे.

अखेर आलियाला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे. ती म्हणाली, किती वेळ रोल आहे यापेक्षा तो कसा आहे, त्याचे महत्व किती, त्यामागील दिग्दर्शकाची भूमिका काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. आलिया आणि रणबीर सध्या ब्रम्हास्त्रचं सक्सेस हे इंजॉय करताना दिसत आहे. दुसरीकडे ब्रम्हास्त्रमध्ये ज्या बड्या कलाकारांनी महत्वाची भूमिका केली आहे त्यांना ज्याप्रकारे डावलण्यात आले त्याविषयी नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. डिंपल यांच्याबरोबरच टॉलीवूडच्या नागार्जुनला देखील फारसा वाव मिळालेला नाही. अशी ओरड चाहत्यांनी केली आहे.

एकीकडे अयान मुखर्जी यांच्या ब्रम्हास्त्रवर कौतूकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे बड्या कलाकारांना कमी स्क्रीन टाईम मिळाल्याची तक्रार होताना दिसते आहे. आलियानं ब्रम्हास्त्रमध्ये ईशाची भूमिका केली आहे तर रणबीरनं शिवाची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी आलिया ही शिवा शिवा असे म्हटल्यानं ट्रोल झाली होती. त्यानंतर आता डिंपल कपाडिया यांना कमी स्क्रीन टाईम मिळाल्यानं तिच्यावर टीका होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT